दिल्लीच्या प्रसिद्ध छत्रसाल स्टेडियमवर कुस्तीपटू सागर राणा याच्या हत्येच्या पोस्टमार्टम अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोस्टमार्टम रिपोर्टनुसार सागरच्या शरीरावर अनेक ठिकाणी निळ्या रंगाचे निशान होते आणि त्यावर धारदार जड वस्तूने मारा करण्यात आला होता. यामुळे ऑलिम्पिक स्पर्धेत पदकविजेता सुशील कुमार याच्या अडचणीत वाढ झाली आहे. सुशील कुमार याला रेल्वे सेवेतून देखील निलंबीत करण्यात आले आहे.

सागर राणा याला ५ मेच्या मध्यरात्री दुपारी ३ वाजेच्या सुमारास जवळच्या बीजीआरएम रुग्णालयात नेण्यात आले आणि नंतर त्यांना ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले, तेथे सकाळी ७: १५ वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात ऑलिम्पिक स्पर्धेत पदकविजेते सुशील कुमार आणि आणखी एकास अटक करण्यात आली आहे.

सागरच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमांचे निळे निशान होते. डोक्यापासून गुडघ्यापर्यंत जखमा होत्या. शरीरावर ब्लंट ऑब्जेक्टने हल्ला केल्याचे पोस्टमॉर्टममध्ये समोर आले आहे.  कारण त्याच शरीरावर १ ते ४ सेंटीमीटर खोल जखमा  आढळल्या. ही जखम इतकी खोल होती की हाडापर्यंत जखम झाली होती.

अटक टाळण्यासाठी सुशील कुमार १८ दिवसांत ७ राज्यांमधून भटकला! पण शेवटी जाळ्यात अडकलाच!

जहांगीरपुरी येथील बीजेआरएमएच रुग्णालयाचे डॉ. मुनीष वाधवन यांच्या अहवालानुसार तपासणीसाठी व्हिसेरा आणि रक्ताचे नमुने सील करण्यात आले आहेत. डोक्यावर बोथट वस्तूने वार केल्यामुळे सागरचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांच्या मते शरीरावर आढळलेल्या सर्व खुणा मृत्यूच्या अगोदरच्या आहेत.