गेल्या महिन्याभरापासून महिला कुस्तीपटूंनी दिल्लीच्या जंतर-मंतरवर आंदोलन पुकारले आहे. भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी हे आंदोलन सुरू आहे. त्यांच्या आंदोलनाला शेतकरी संघटनांनीही मोठा पाठिंबा दिला होता. आता शेतकरी संघटना किमान आधारभूत किंमतीसाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. म्हणून, साक्षी मलिक हिनेही शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.

सूर्यफुलांच्या किमान आधारभूत किंमतीसाठी शेतकरी संघटनांनी आंदोलन पुकारले आहे. हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला जातोय. तसंच, काही शेतकऱ्यांवर लाठीजार्च केल्याचाही दावा आहे. तसंच, काही शेतकरी नेत्यांनाही अटक करण्यात आली आहे. यामध्ये शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गुरनाम चरुनी यांनाही अटक झाली आहे. त्यांना लवकरात लवकर सोडण्याचे आवाहन साक्षी मलिकने ट्वीटद्वारे केलं आहे.

rape case in Gaziayabad
प्रियकराने केलेला बलात्कार लपवण्यासाठी आई करायची १० वर्षांच्या मुलीचा छळ, वेश्या व्यवसायात ढकलण्याचाही प्रयत्न
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
sanjay raut raj thackeray
राज ठाकरे यांना मविआत घेण्याचे प्रयत्न का झाले नाहीत? संजय राऊत म्हणाले, “मनसे अध्यक्षांना वाटायचं…”
What Navneet Rana Said?
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया, “मला माझी मुलं रोज विचारायची, आई…”

“शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांसाठी फक्त एमएसपी (किमान आधारभूत किंमत) मागितला. पण क्रूर यंत्रणेने त्यांच्यावर लाठीचार्ज केला आणि त्यांना अटक केली. शेतकरी नेते गुरनाम सिंग चरुनी यांच्या अटकेचा आम्ही निषेध करतो, त्यांची लवकर सुटका करण्यात यावी. आंदोलनात शेतकरी शहीद झाल्याच्या बातमीने डोळ्यात पाणी आले”, असं ट्वीट साक्षी मलिकने केले आहे. हे ट्वीट करताना साक्षीने काही फोटोही पोस्ट केले आहेत. यामध्ये अनेकांच्या पाठीवर जखमा दिसत आहेत.

शेतकऱ्यांच्या पाठीवर जखमांचे व्रण असलेले फोटो साक्षीने ट्वीट केल्यानंतर तिच्यावर अनेकांनी टीकाही केली. तिने शेअर केलेले फोटो जुने फोटो असल्याचा दावा नेटिझन्स करत आहेत. तिने ट्रोलर होऊ नये, असंही आवाहन नेटिझन्सकडून करण्यात येतंय.

शेतकरी आंदोलनात नेमकं काय झालं?

मंगळवारी शाहाबाद येथे दिल्ली चंदीगढ महामार्गवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार करण्यात आला. यावेळी भारतीय शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गुरमान सिंह चरुनी यांच्यासह १० जणांना ताब्यात घेण्यात आले. शेतकरी नेत्यांना जोरवर सोडलं जात नाही तोवर शाहबादमध्ये आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा पवित्रा शेतकरी नेते राकेश टीकैत यांनी घेतला आहे. तसंच, हरियाणानंतर शेतकरी दिल्लीतही मोठं आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत.

हरियाणात दुसऱ्या दिवशीही शेतकरी आंदोलन सुरूच आहे. चंदीगड-दिल्ली महामार्ग रोखल्याप्रकरणी भारतीय किसान युनियन चरुनी गटाचे अध्यक्ष गुरनाम सिंग चरुनी यांच्यासह नऊ नेत्यांना मंगळवारीच अटक करण्यात आली होती. आता पोलिसांनी आणखी ७०० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर आता शेतकरी एमएसपीसाठी मोठे आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. हरियाणातील १४ जिल्ह्यांमध्ये बुधवारी शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको केला. राज्यातील १४ जिल्ह्यांत सुमारे २४ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. त्याचबरोबर पाच जिल्ह्यांतील टोलनाकेही मोफत करण्यात आले.

गुरनाम चरुनीसह ९ शेतकरी नेत्यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे वकील गुरनाम सिंग म्हणतात की अटक केलेल्या शेतकऱ्यांवर महामार्ग जाम, खुनाचा प्रयत्न आणि इतर गुन्हे दाखल आहेत.