जगातील सर्वात मोठ्या कंडोम उत्पादक कंपनीच्या विक्रीत गेल्या दोन वर्षांत ४० टक्क्यांनी घट झाली आहे. कंपनीने आधी अंदाज व्यक्त केला होता की करोनाच्या काळात लोक सर्व निर्बंधांमुळे घरातच राहतील, ज्यामुळे कंडोमची विक्री वाढेल. कंपनीला विक्रीत वाढ होईल असे वाटले होते मात्र तर उलट घडले आणि विक्रीत मोठी घट झाली. करेक्स बीएचडीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोह मिया कियाट यांनी ही माहिती दिली आहे. निक्केई एशियाच्या अहवालानुसार, करोनाच्या काळात लैंगिक आरोग्य केंद्रे बंद राहिल्यामुळे आणि सरकारी कंडोमचे महत्त्व सांगणाऱ्या कार्यक्रमांच्या अभावामुळे केरेक्सच्या कंडोमच्या विक्रीत घट झाली आहे. केरेक्स ही मलेशियन कंपनी आहे जी जगात पाच पैकी एक कंडोम बनवते.

ही मलेशियन गर्भनिरोधक कंपनी वर्षाला सुमारे ५.५ अब्ज कंडोम तयार करते आणि ड्युरेक्स आणि वन कंडोम सारख्या ब्रँडला पुरवठादार आहे. ते स्वतःचे कंडोम ब्रँड देखील तयार करते. अनेकजण असे गृहीत धरतील की लोकांच्या हालचालींच्या निर्बंधांमुळे घरामध्ये सेक्स करण्याशिवाय काही करायचे नाही, पण तशी परिस्थिती दिसत नाही, असे करेक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोह मिया कियाट यांनी माध्यमांना सांगितले.

8 point 85 percent interest rate on fixed deposits by Bajaj Finance
बजाज फायनान्सतर्फे मुदत ठेवींवर ८.८५ टक्के व्याजदर
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात
Kia adds two new automatic variants
बाकी कंपन्यांचे धाबे दणाणले, Kia ने सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारचे आणले २ नवे व्हेरिएंट, किंमत…
Top Companies, Lose, Rs 1.97 Lakh Crore , market valuation, infosys, tcs, hdfc bank, hindustan unilever, finance, financial knowledge, financial year end,
आघाडीच्या १० कंपन्यांपैकी पाच कंपन्यांना बाजारभांडवलात १.९७ लाख कोटींची घट

करोना विषाणूच्या पहिल्या लाटेत, मार्च २०२० पासून लॉकडाऊनमुळे संपूर्ण देश आपापल्या घरात कैद झाले होते. अशा स्थितीत अनेक लोक घरातच अडकले होते. या संदर्भात, Concierge service app Dunzo च्या डिलिव्हरी ट्रेंडमध्ये एक अहवाल आला आहे, ज्यानुसार, करोनाच्या काळात, लोकांनी घरात राहून कंडोम आणि रोलिंग पेपरची प्रचंड खरेदी केली. त्याच वेळी, आशियातील सर्वात मोठी कंडोम निर्माता कंपनी करेक्ससाठी गेली दोन वर्षे खूप वाईट होती.

भारतात २०१७ मध्ये एक काळ असा होता जेव्हा टीव्हीवर कंडोमच्या जाहिराती दाखवण्यावर काही काळ सर्व बंदी घालण्यात आली होती, पण नंतर परवानगी देण्यात आली. मात्र आजही अनेकांना कंडोम खरेदी करण्यास संकोच वाटतो, पण असे असूनही, निल्सनच्या एका अहवालानुसार, भारतात कंडोमचा व्यवसाय सुमारे १५०० कोटी रुपयांचा आहे.

नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेनुसार, ९७.९ टक्के लैंगिकदृष्ट्या सक्रिय पुरुषांना कंडोमचे महत्त्व समजले आहे, तर केवळ ८४ टक्के लोकांना कंडोमच्या वापराविषयी माहिती आहे. कंडोममुळे त्यांची क्षमता कमी होईल अशी भीती गावकऱ्यांना वाटते. भारतातील एकूण कंडोम व्यवसायातील ग्रामीण भागाबद्दल बोलायचे तर, सुमारे ३० टक्के व्यवसाय हा ग्रामीण भागातून होतो.