बाबरी मशीद पाडली गेल्यानंतर नरसिंह राव यांनी मंत्र्यांशी संवाद टाळला ; सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकातील दावा

खुर्शीद म्हणतात, की बाबरी मशीद पाडण्याची घटना धक्कादायक होती हे तर खरेच. त्यानंतर सगळीकडे सन्नाटा पसरला होता.

नवी दिल्ली : बाबरी मशीद ६ डिसेंबर १९९२ रोजी पाडली गेली, त्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला आम्ही सर्व जमलो होतो. त्या वेळी भावना व्यक्त करण्याचा उद्देश होता, पण पंतप्रधान नरसिंहराव यांनी, ‘मला तुमच्या सहानुभूतीची गरज नाही’ अशी तुसडी प्रतिक्रिया व्यक्त करीत सहकाही मंत्र्यांशी या विषयावर संवाद टाळला, अशी आठवण माजी मंत्री सलमान खुर्शीद यांनी त्यांच्या ‘सनराइज ओव्हर अयोध्या- नेशनहूड इन अवर टाइम्स’ या पुस्तकात सांगितली आहे.

खुर्शीद म्हणतात, की बाबरी मशीद पाडण्याची घटना धक्कादायक होती हे तर खरेच. त्यानंतर सगळीकडे सन्नाटा पसरला होता. रविवारी मशीद पाडली गेली व ७ डिसेंबरच्या सकाळी संसदगृहाच्या तळमजल्यावर मंत्रिमंडळाची बैठक झाली. सगळय़ांच्याच मनात खिन्नता होती. सगळे जण शोकाकुल होते. कुणीही एक शब्द  बोलायला तयार नव्हते, तेव्हा माधवराव शिंदे यांनी बोलायला सुरूवात केली. त्यावर पंतप्रधानांनी, ‘कृपा करून मला तुमची सहानुभूती दर्शवू नका’, असे वक्तव्य केले. राव यांनी अत्यंत कठोर प्रतिसाद दिला होता, नंतर त्या विषयावर चर्चाच झाली नाही.  ती बैठक संपली. उत्तर प्रदेशचे कल्याणसिंह सरकार ६ डिसेंबरला  बरखास्त करण्यात आले, त्यानंतर आठवडाभराने हिमाचल प्रदेश, राजस्थान व मध्य प्रदेश येथील सरकारे राष्ट्रपतींनी बरखास्त केली.

खुर्शीद यांनी म्हटले आहे, की ६ डिसेंबरच्या रात्री आम्ही तरुण मंत्री राजेश पायलट यांच्या घरी जमलो होतो. नंतर आम्ही सी.के जाफर शरीफ यांच्या निवासस्थानी गेलो. हे दोघे नेते त्याकाळात थोडेसे बुलंद आवाजाचे नेते होते. नंतर मुख्य सचिव ए.एन वर्मा यांना आम्ही फोन केला. त्यांनी पंतप्रधानांशी बोलण्यास सांगितले. त्यानंतर आम्ही पंतप्रधानांना दूरध्वनी करून फैजाबादला जाणाऱ्या शिष्टमंडळात पायलट यांचा समावेश करण्याची विनंती केली. नंतर राव यांनी मुख्य सचिव वर्मा यांच्याशी बोलण्यास सांगितले. कारण पंतप्रधान बोलण्यास उपलब्ध नव्हते.

खुर्शीद यांच्या मते मंदिर मशीद वादात काँग्रेसपुढे उत्तर प्रदेशात अस्तित्वाचा प्रश्न उभा होता. त्या काळात हिंदूू व मुस्लीम समाजात असे काही संघटित गट होते जे संबंधित समुदायांना मंदिर व मशिदीच्या बाजूने उभे राहण्याचे आवाहन करीत होते. नंतरच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने या इतिहासावर शिक्कामोर्तब केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Salman khurshid book narasimha rao babri masjid demolition zws

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या