समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशातील माजी मंत्री आझम खान मुलासह फरार आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. रामपूरचे आमदार आझम खान आणि त्यांचे पुत्र आमदार अब्दुल्ला खान काही काळापासून न्यायालयात हजर होण्यास टाळाटाळ करत आहेत, असे पोलिसांनी सांगितले आहे. २२ सप्टेंबरला खान पिता-पुत्रांनी गरज नसल्याचे सांगत राज्य सरकारने पुरवलेली सुरक्षा नाकारली होती.

“…म्हणून अशा लोकांचा बंदोबस्त केला पाहिजे”, एकनाथ शिंदेंचं नाशिकमध्ये वक्तव्य

“२०१९ मध्ये चीथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी आझम खान यांच्याविरोधात स्थानिक न्यायालयात खटला दाखल आहे. या खटल्यातील सुनावणी अंतिम टप्प्यात असून लवकरच निकाल अपेक्षित आहे. हृदय शस्त्रक्रियेचे कारण देत या खटल्यातील सुनावणीला आझम खान १७, १९ आणि २३ सप्टेंबरला गैरहजर होते. आझम खान न्यायालयात येण्यास सक्षम आहे की नाही हे तपासण्यासाठी मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेत एक समिती स्थापन करण्यात आली आहे”, अशी माहिती रामपूरचे पोलीस अधीक्षक अशोक कुमार यांनी दिली आहे. आझम खान यांच्याबाबत त्यांच्या वकिलालाही माहिती नसल्याचे कुमार यांनी सांगितले आहे. आझम पिता-पुत्रांवर काय कारवाई करावी हे न्यायालयावर अवलंबून आहे. आम्ही न्यायालयाच्या आदेशाचे पालन करू, असे कुमार यांनी म्हटले आहे.

‘इन्फोसिस फाउंडेशन’च्या सुधा मूर्ती सर्वांसमोर ‘या’ व्यक्तीच्या पडल्या पाया; फोटोवरुन निर्माण झाला वाद, जाणून घ्या प्रकरण काय

दरम्यान, गेल्या आठवड्यात अब्दुल्ला हेदेखील न्यायालयात सुनावणीसाठी गैरहजर असल्याचे कुमार म्हणाले आहेत. “सर गंगा राम रुग्णालयात दाखल असताना त्यांनी सुरक्षा नाकारली होती. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानी सुरक्षा रक्षकांना पाठवण्यात आले होते. तेव्हा हे पिता-पुत्र घरी नव्हते”, असे कुमार यांनी सांगितले आहे.

Anti Hijab Protest: गायिकेनं चक्क स्टेजवर कापले केस; कारण जाणून आश्चर्य वाटेल, पाहा व्हिडीओ

आझम खान यांना राज्य सरकारकडून वाय श्रेणीनुसार तीन पोलिसांकडून सुरक्षा पुरवण्यात येत होती. सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिल्यानंतर या वर्षाच्या सुरवातीला खान यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली होती. त्यांच्याविरोधात चोरी आणि भ्रष्टाचारासंदर्भात ९० गुन्हे दाखल आहेत.