सॅमसंग नोट ७ या मोबाईलमागे लागलेले शुक्लकाष्ठ काही संपण्याची चिन्हे नाहीत. सदोष बॅटरीमुळे बदलून दिलेल्या फोनमधूनही धूर निघाल्याची घटना घडल्याने सॅमसंगने आता नोट ७ या फोनचे उत्पादन तात्पुरते थांबवले आहे.  यामुळे सॅमसंगची नाचक्की झाली असून उत्पादन थांबवल्याने कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

सॅमसंगने काही महिन्यांपूर्वी गाजावाजा करत दिमाखदार सोहळ्यात गॅलेक्सी नोट ७ हा मोबाईल फोन लाँच केला होता. पण सदोष बॅटरीमुळे फोनने पेट घेतल्याची घटना समोर आली होती. जगभरात  अशा स्वरुपाच्या ३० हून अधिक घटना घडल्याने सॅमसंगला बाजारातून नोट ७ मोबाईल परत मागवावा लागला होता. सॅमसंगला जगभरातून सुमारे २५ लाख नोट ७ फोन परत मागवावे लागले होते. तसेच ज्या ग्राहकांनी नोट ७ घेतला होता त्यांनादेखील फोन बदलून देण्यात आले होते. मात्र आता नव्याने दिलेल्या नोट ७ मधूनही धूर निघाल्याची माहिती समोर आली आहे. फोनमधून धूर निघाल्याने एक विमान खाली करावे लागले होते. त्यामुळे सॅमसंगने शेवटी नोट ७ या फोनचे उत्पादन थांबवले आहे.

nestle India shares slip after reports says baby food contain high levels of added sugar
नेस्लेला ८,१३७ कोटी बाजार भांडवलाची झळ; दुग्धजन्य पदार्थांबाबतच्या वृत्ताने भांडवली बाजारात समभागात घसरण
mumbai, registered vehicle number, RTO, traffic jam, vehicular pollution
मुंबईत वाहतूक कोंडी, प्रदूषणाचे संकट; वर्षभरात अडीच लाख वाहनांची नोंदणी; एकूण वाहने ४६ लाखांवर
wheat India wheat production estimated at 1120 lakh tonnes this year
यंदा गव्हाचे उच्चांकी उत्पादन? तापमान वाढीची झळ कमी; ११२० लाख टन उत्पादनाचा अंदाज
chocolate expensive, decline in cocoa production,
विश्लेषण: जगभरात चॉकोलेट का महागली? कोको उत्पादनात घट झाल्याचा परिणाम?

चीन आणि अमेरिकेतील कंपनीच्या मदतीने सॅमसंग नोट ७ तयार करण्याचे काम सुरु होते. मात्र आता उत्पादनच थांबवण्यात आले असून आम्ही सॅमसंग नोट ७ ची विक्री तसेच बदलून देण्याची प्रक्रीया स्थगित केली आहे असे अमेरिकेत सॅमसंगसाठी काम करणा-या कंपनीतील अधिका-यांनी सांगितले. मात्र सॅमसंगने अधिकृतपणे या वृत्तावर प्रतिक्रिया दिलेली नाही.

सॅमसंग ही दक्षिण कोरियातील कंपनी असून मोबाईल उत्पादन क्षेत्रात सॅमसंग आघाडीवर आहे. पण नोट ७ मुळे सॅमसंगच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. सॅमसंगच्या शेअरच्या दरातही घट झाली असून सॅमसंगच्या विक्रीवरही याचा परिणाम होईल असे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे नोट ७ प्रकरण सॅमसंगसाठी महागात पडेल असेच दिसते.