गेल्या काही दिवसांपासून आम आदमी पक्षात अनेक राजकीय घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. आम आदमी पार्टीच्या सात खासदारांनी काही दिवसांपूर्वीच भाजपात प्रवेश केला. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना मोठा राजकीय धक्का बसला. या सातही खासदारांना भाजपा खासदार म्हणून राज्यसभेने मान्यताही दिली आहे. या सर्व घडामोडीनंतर आता या सात खासदारांपैकी एक असलेले खासदार संदीप पाठक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
आम आदमी पार्टी (आप) सोडून भाजपामध्ये सामील झाल्यानंतर काही दिवसांतच खासदार संदीप पाठक यांच्या विरोधात पंजाबमध्ये दोन एफआयआर दाखल झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. पंजाब पोलिसांकडून दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये संदीप पाठक यांच्या विरोधात हे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती सांगितली जात आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
या एफआयआरमध्ये भ्रष्टाचार आणि महिलांचा छळ यांसारखे अजामीनपात्र आरोप समाविष्ट असल्याचं वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान, हे वृत्त समोर आल्यानंतर भाजपाने आम आदमी पक्षावर सूडाच्या राजकारणाचा आरोप केला आहे. संदीप पाठक यांनी आम आदमी पक्ष सोडल्यानंतर काही दिवसांतच त्यांच्या विरोधात दोन गुन्हे दाखल झाल्यामुळे या कारवाईबाबत भाजपाच्या नेत्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
दरम्यान, गुन्ह्यांचा अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नसला तरी अजामीनपात्र कलमांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे पाठक यांच्या विरोधात अटकेसह पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण पंजाब पोलिसांनी अद्याप या प्रकरणी सविस्तर निवेदन जारी केलेलं नाही. या सर्व घडामोडींवर खासदार पाठक यांनी प्रतिक्रिया देत आपल्याला याबाबत काहीही माहिती नसल्याचं म्हटलं आहे.’
#WATCH | Delhi: Punjab Police have reportedly filed two FIRs under sections for non-bailable offences against Rajya Sabha MP Sandeep Pathak. Both FIRs were filed in different districts of Punjab.
— ANI (@ANI) May 2, 2026
In a telephone conversation with ANI, he says, "I have no idea of any FIR against… pic.twitter.com/CmVSCFBbq8
संदीप पाठक यांनी काय प्रतिक्रिया दिली?
“अशा कोणत्याही एफआयआरची मला अद्याप काही माहिती नाही. तसेच कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने मला याबाबत काहीही कळवलेलं नाही. मी माझं संपूर्ण आयुष्य प्रामाणिकपणाने देशाची सेवा केली आहे. देश कोणत्याही पक्षापेक्षा मोठा आहे. त्यामुळे मी त्याचा कधीही विश्वासघात करणार नाही. किंवा कोणालाही तसं करू देणार नाही. माझ्यासारख्या व्यक्तीविरुद्ध जर कोणती कारवाई सुरू झाली असेल, तर त्यातून ते किती घाबरले आहेत हेच दिसून येतं. मला यावर अधिक काही बोलायचं नाही”, असं संदीप पाठक यांनी म्हटलं आहे.
#WATCH | Delhi: Punjab Police have reportedly filed two FIRs under sections for non-bailable offences against Rajya Sabha MP Sandeep Pathak. Both FIRs were filed in different districts of Punjab.
— ANI (@ANI) May 2, 2026
In a telephone conversation with ANI, he says, "I have no idea of any FIR against… pic.twitter.com/CmVSCFBbq8
पंजाब सरकारचे मंत्री डॉ. रवज्योत सिंग यांनी संदीप पाठक यांच्यावरील या गुन्ह्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. या सर्व घडामोडींमुळे पंजाबच्या राजकारणात आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप करण्यात येत असल्याने राजकारण चांगलंच तापलं आहे.
भाजपाच्या गळाला लागलेले सात खासदार कोण?
राघव चड्ढा, अशोक मित्तल, विक्रम सहानी, संदीप पाठक, हरभजन सिंग, स्वाती मालीवाल आणि राजेंद्र गुप्ता यांचा समावेश आहे. यातील राघव चड्ढा, अशोक मित्तल, संदीप पाठक यांनी अधिकृतरित्या भाजपात प्रवेश देखील केला आहे.
संदीप पाठक कोण आहेत?
संदीप पाठक हे राज्यसभेचे खासदार आहेत. २०२२ मध्ये पंजाबमधून संदीप पाठक हे राज्यसभेत दाखल झाले होते. संदीप पाठक यांनी केंब्रिज विद्यापीठात शिक्षण घेतलेलं आहे. संदीप पाठक यांनी २०२० च्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुका आणि २०२२ च्या पंजाब निवडणुकांच्या दरम्यान ‘आप’च्या महत्वाच्या रणनीतीत त्यांची महत्त्वाची भूमिका होती असं बोललं जातं.

भाजपाने ‘ऑपरेशन लोटस’ राबवत केजरीवालांना कसा धक्का दिला?
काही दिवसांपूर्वीच राज्यसभचे खासदार राघव चड्ढा यांना राज्यसभेच्या उपनेते पदावरून आम आदमी पक्षाने हटवलं होतं. त्यामुळे खासदार राघव चड्ढा हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नव्हती. मात्र, काही दिवसांपूर्वीच खासदार राघव चड्ढा यांच्यासह काही खासदारांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर भाजपाने ‘ऑपरेशन लोटस’ नेमकं कसं राबवलं? याबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.
राज्यसभेतील ‘आप’चं संख्याबळ ३ वर
आम आदमी पक्षाचे राज्यसभेत एकूण १० खासदार होते. मात्र, यातील ७ खासदार हे भाजपाच्या गळाला लागले असून भाजपात प्रवेश देखील केला. त्यामुळे आता राज्यसभेत आम आदमी पक्षाचं संख्याबळ १० वरून फक्त 3 वर आलं आहे. या तीनमध्ये संजय सिंह, संत बलबीर सिंग सीचेवाल आणि एन.डी.गुप्ता यांचा समावेश आहे.
