RBI Governer : रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी संजय मल्होत्रा यांची निवड करण्यात आली आहे. ११ डिसेंबर पासून पुढील तीन वर्षांसाठी त्यांचा कार्यकाळ असणार आहे. कॅबिनेटच्या समितीने त्यांची महसूल सचिव पदी असलेल्या संजय मल्होत्रा यांची निवड रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी केली आहे. ANI या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे.

कोण आहेत संजय मल्होत्रा?

सध्याचे रिझर्व्ह बँकेचे गवर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ उद्या, १० डिसेंबर रोजी संपत आहे. संजय मल्होत्रा हे १९९० च्या राजस्थान कॅडरचे IAS अधिकारी आहेत. नोव्हेंबर २०२० मध्ये ते आरईसीचे चेअरमन आणि एमडी या पदावर नियुक्त झाले. त्याआधी ते उर्जा मंत्रालयात अतिरिक्त सचिव पदावर कार्यरत होते. २०२२ मध्ये डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेसचे सचिव या पदावर ते कार्यरत होते. संजय मल्होत्रा यांना केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेच्या संचालक पदीही नियुक्त केलं होतं. आता त्यांना आरबीआयचे गव्हर्नर हे पद देण्यात आलं आहे. पुढील तीन वर्षांसाठी त्यांचा कार्यकाळ असणार आहे.

संजय मल्होत्रा ११ डिसेंबरपासून स्वीकारणार पदभार

संजय मल्होत्रा (Sanjay Malhotra) हे महसूल सचिव या पदावर कार्यरत आहेत.

मल्होत्रा यांची आता रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती झाली आहे. पुढील तीन वर्षांसाठी ते हे पद सांभाळतील.

संजय मल्होत्रा ​​हे १९९० बॅचचे राजस्थान केडरचे IAS (भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी) आहेत.

त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कानपूर येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये अभियांत्रिकी पदवी घेतली आहे.

मल्होत्रा यांनी प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी, यूएसए येथून पब्लिक पॉलिसी या विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.

संजय मल्होत्रा (Sanjay Malhotra) हे १९९० च्या बॅचचे आणि राजस्थान केडरचे सनदी अधिकारी आहेत. त्यांनी कानपूरमधून कंप्यूटर विज्ञान मध्ये अभियांत्रिकीची पदवी मिळवली आहे. याशिवाय त्यांनी अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठातून सार्वजनिक धोरणात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. संजय मल्होत्रा ​​यांनी ऊर्जा, वित्त आणि कर, माहिती तंत्रज्ञान, खाणी इत्यादींसह विविध क्षेत्रांमध्ये काम केले आहे. सध्या ते अर्थ मंत्रालयात सचिव (महसूल) आहेत. त्यांनी भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत वित्तीय सेवा विभागात सचिवपद भूषवले होते. संजय मल्होत्रा (Sanjay Malhotra) यांना राज्य आणि केंद्र सरकारमधील वित्त आणि कर आकारणी या क्षेत्राचा मोठा अनुभव आहे. ते प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांच्या संदर्भात कर धोरण तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.

Story img Loader