Sanjay Raut On Gujarat Election Result : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभेसाठी निवडणुका पार पडल्या आहेत. उद्या म्हणजेच ८ दिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहेत. तत्पूर्वी गुजरातमध्ये पुन्हा भाजपा सत्तेत येईल, असं मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. तसेच गुजरातमध्ये काँग्रेसची मेहनत आणि यंत्रणा दोन्ही कमी पडले, असंही ते म्हणाले. टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यांसदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “देशातील सर्वात छोट्या पक्षाने जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाला हरवलं”, आपचा भाजपाला खोचक टोला

loksatta editorial Supreme court descion regarding candidate affidavit on asstets
अग्रलेख: अपवादांचा अपराध!
Lok Sabha election 2024 Heavy marching in North Nagpur Predominance of Congress and BJP is also ready
रणसंग्राम लोकसभेचा : उत्तर नागपुरात जोरदार मोर्चेबांधणी; काँग्रेसचे प्राबल्य, भाजपही सज्ज!
Congress 11th list of Lok Sabha candidates announced
काँग्रेसची ११ वी यादी जाहीर; वाय एस शर्मिला लोकसभेच्या मैदानात, आंध्र प्रदेशमध्ये बहिण-भाऊ येणार आमनेसामने
Arunachal Pradesh Assembly
निवडणुकीच्या रणसंग्रामाशिवाय आमदार अन् खासदार होणाऱ्यांची गोष्ट

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

“लोकांच्या मनात कायम शंका असते, की मतदान कोणालाही केलं तर निकाल भाजपाच्या बाजुने लागतात. त्यामुळे आपण निकालाची वाट बघायला पाहिजे. लोकांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत. मात्र, भाजपा गुजरात हातातून जाऊ देतील, असं वाटत नाही. हिमाचल प्रदेशमध्ये अटीतटीचा सामना आहे. हिमाचलमध्ये काँग्रेसने चांगली लढत दिली आहे. तिथे काँग्रेसने मेहनत घेतली. मात्र, गुजरातमध्ये काँग्रेसची मेहनत आणि यंत्रणा दोन्ही कमी पडलेत, असं माझं मत आहे”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

हेही वाचा Delhi MCD Election Result : दिल्ली महापालिका निवडणुकीतील ‘आप’च्या विजयावर मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

यावेळी दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीतील काँग्रेसच्या प्रदर्शनाबाबत विचारलं असता, “राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा परिणाम तुम्हाला लोकसभेला दिसेल. राहुल गांधींनी स्वत:चं नेतृत्व सिद्ध केलं आहे. या यात्रेतून त्यांनी देश ढवळून काढला आहे. त्याचा परिणाम तुम्हाला लगेच दिसणार नाही”, असं ते म्हणाले.

हेही वाचा – Delhi MCD Election: “आम्हाला पंतप्रधानांचे आशीर्वाद आणि केंद्राचं…”; ‘आप’च्या ऐतिहासिक विजयानंतर केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान, गुजरातमध्ये एकूण १८२ विधानसभेच्या जागा आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यात १ डिसेंबरला ८९ जागांसाठी मतदान झालं होतं. तसेच सोमवारी (५ डिसेंबर) दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांसाठी मतदान पार पडलं. यंदा गुजरातमध्ये भाजपा, काँग्रेस आणि आप अशी तिरंगी लढत पाहायला मिळाली. त्यामुळे मतदार कोणाला कौल देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.