उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात आला. वेळेत अर्ज भरूनही तो रद्द केला गेला. निवडणूक अधिकारी, जिल्हा दंडाधिकारी या प्रकरणावर सुनावणी करण्यासही तयार नाहीत. हे सगळं भाजपाच्या दबावामुळे होत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. भाजपा शिवसेनेला घाबरते, म्हणून ते हे सगळं करताहेत. ही लोकशाही नाही, निवडणुका भीतीदायक नसाव्या, आमच्या उमेदवारांना धमकावलं जातंय. भाजपाला आमच्या हिंदुत्वाची भीती आहे. पण आता ते जे करताहेत ते त्यांना भविष्यात नक्कीच महागात पडणार आहे, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

“आम्ही पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढवतोय. पण आतापर्यंत आमच्या ५-६ उमेदवारांचे अर्ज बेकायदेशीरपणे रद्द करण्यात आले आहेत. माझ्याकडे याचे पुरावे आहेत की ३ वाजेआधी अर्ज दाखल करण्यात आला होता, तरीही आमच्या उमेदवारांचे अर्ज रद्द केले. भाजपाचे अर्ज चुकासहीत स्वीकारले. गोव्यातही असाच प्रकार सुरू आहे. एकतर आमच्यामुळे त्यांचा पराभव होईल, किंवा आम्ही जिंकू, या कारणांनेच उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला आमची भीती वाटतीये,” असा दावा संजय राऊत यांनी केला.

salman khan house firing case abhishek ghosalkar wife
सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल; म्हणाल्या, “मला सुरक्षा का नाही?”
narayan rane marathi news, deepak kesarkar marathi news
वैयक्तिक स्वार्थापोटी अपशकून करत असेल तर पर्वा करणार नाही, नारायण राणे यांचा मित्र पक्षाच्या नेत्यांना टोला
kolhapur lok sabha marathi news, hatkanangale marathi news
सन्मान नाही तोवर प्रचार नाही; संजय पाटील यांची धैर्यशील माने यांच्यावर नाराजी
rajiv bajaj, change does not come from slogans
“मेक इन इंडिया, विकसित भारत घोषणाबाजीने बदल घडत नाही!”, असं का म्हणाले राजीव बजाज…

“याप्रकरणी आम्ही दिल्लीत जाऊन निवडणूक आयुक्तांना भेटणार आहोत, नंतर पुढे काय करायचं ते ठरवू. आमच्या उमेदवारांना धमकावलं जातंय. शिवसेनेला उत्तर प्रदेशमध्ये पाय ठेवू द्यायचा नाही, म्हणून हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. युपीमध्ये शिवसेनेला मिळणाऱ्या पाठिंब्याची विरोधकांना भीती वाटतीये, अशी टीका राऊत यांनी केली. राजकारणात बरेच लोक विसरतात की ते काय आहेत, त्यांना सामनातून त्यांची जागा दाखवली जाते. सामना हा आरसा आहे,” असंही राऊत म्हणाले.

उत्तर प्रदेशमध्ये कायद्याचं राज्य आहे, असं गृहमंत्री अमित शाह म्हणाले होते, यावरूनही राऊतांनी टोला लगावला. ते म्हणाले, “देशाच्या गृहमंत्र्यानं देशाचा गृहमंत्री असल्याचीच भाषा बोलायला हवी. कायद्याचं राज्य आहे की नाही, ते बघणं तुमचं काम आहे,” असं ते म्हणाले.

…तर जिनांवर गोळी का झाडली नाही

आज महात्मा गांधींची पुण्यतिथी आहे. राहुल गांधींनी ट्वीट करत आजच्याच दिवशी हिंदुत्ववाद्यांनी गांधीजींची हत्या केली होती, असं म्हटलंय. यावर बोलताना राऊत म्हणाले, की गोडसे जर खरा हिंदुत्ववादी असता तर जिनाला गोळी मारली असती. गांधींना का गोळी मारली. पाकिस्तानची मागणी तर जिनांनी केली होती. असं ते म्हणाले. “मर्दानगी होती, तर गांधींना का मारलं, जिनांना का मारलं नाही, असा सवाल राऊतांनी केला. वेगळ्या पाकिस्तानची मागणी जिनांनी केली होती. जर गोळी मारणारा खरा हिंदुत्वावादी होता आणि त्याच्यात हिम्मत होती, तर फाळणीला कारणीभूत असलेल्या जिनांवर गोळी झाडायला हवी होती, नि:शस्त्र गांधींवर का गोळी झाडण्यात आली. गांधींच्या काही भूमिकांवर टीका होऊ शकते, परंतु त्यांच्यावर टीका होऊच शकत नाही, क्रांतीकारक म्हणून त्यांचं योगदान असामान्य होतं. कोणताही राष्ट्रभक्त गांधींवर कधीच गोळ्या झाडू शकत नाही,” असं राऊतांनी सांगितलं.