भारत हा हिंदूंचा देश आहे, हिंदुत्ववाद्यांचा नाही असे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी केले आहे. महागाईविरोधात जयपूरमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुध्ये काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल तसेच पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी सहभागी झाल्या होत्या. या देशात हिंदुत्ववाद्यांमुळे महागाई वाढत आहे. जनतेला त्रास होत आहे. सात वर्षांत पंतप्रधानांच्या तीन ते चार उद्योगपती मित्रांनी देशाचे वाटोळे केले आहे असा आरोप राहुल यांनी केला. तसेच देशाच्या राजकारणात आज दोन शब्दांची एकमेकांसोबत टक्कर आहे. एक शब्द हिंदू आणि दुसरा शब्द हिंदुत्व. मी हिंदू आहे, हिंदुत्ववादी नाही, असेही राहुल गांधी यांनी म्हटले. याबाबत बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“हा देश सगळ्यांचा जरी असला तरी या देशातील बहुसंख्य हिंदूच्या भावना डावलून या देशामध्ये कोणालाही राजकीय दृष्ट्या एक पाऊलही पुढे टाकता येणार नाही. याबाबत राहुल गांधींसोबत माझी अनेकदा चर्चा झाली होती. तरीही त्यांनी जयपूरच्या रॅलीमध्ये मी हिंदू आहे आणि काँग्रेसचा आत्मा हिंदू आहे असे म्हटले. त्यांच्या बोलण्याचा अर्थ मी इतकाच घेतली की, महात्मा गांधींपासून लोकमान्य टिळकांपर्यंत सगळ्यांचा आत्मा हा हिंदू होता हे राहुल गांधी यांनी मान्य केले. त्यानुसार यापुढे काँग्रेसची पावले पडतील,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

“मग आता काय…”; देशात हिंदूंचं राज्य परत आणायचंय या राहुल गांधींच्या वक्तव्यावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

हिंदुत्ववादी सत्तेसाठी हयात घालवतात. त्यांना सत्याशी काही देणेघेणे नसते अशी टीका राहुल यांनी केली. सत्ताग्रह हा त्यांचा मार्ग असतो, सत्याग्रह नव्हे असा टोलाही लगावला. हिंदू मात्र निर्भीडपणे सामोरा जातो, एक इंचही मागे हटत नाही. मी हिंदू आहे, हिंदुत्ववादी नाही असे राहुल यांनी म्हटले होते.

दरम्यान, विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांचे उमेदवार असले तर स्थानिक स्वराज्य निवडणुकांचे गणित आणि तंत्र ठरलेले आहे. त्यानुसार उमेदवार निवडणुका लढतात आणि विजयी होतात, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.