scorecardresearch

“राहुल गांधींना माझ्याबद्दल चिंता होती, कारण…”, संजय राऊतांचं वक्तव्य

शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झाले. यानंतर त्यांनी या यात्रेत राहुल गांधींबरोबर काय चर्चा झाली याची माहिती दिली.

“राहुल गांधींना माझ्याबद्दल चिंता होती, कारण…”, संजय राऊतांचं वक्तव्य
राहुल गांधी व संजय राऊत (छायाचित्र – सोशल मीडिया)

शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झाले. यानंतर त्यांनी या यात्रेत राहुल गांधींबरोबर काय चर्चा झाली याची माहिती दिली. “राहुल गांधींना माझ्याबद्दल चिंता होती, कारण मला का अटक केली हे त्यांना माहिती होतं,” असं संजय राऊतांनी सांगितलं. ते शुक्रवारी (२० जानेवारी) एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “राहुल गांधींना माझ्याबद्दल चिंता होती. कारण मला अटक का केली हे त्यांना माहिती होतं. कोणत्या कारणासाठी माझा आणि माझ्या कुटुंबाचा छळ सुरू आहे हे त्यांना माहिती होतं. मी वाकत नाही, झुकत नाही. ‘डरो मत’ हा राहुल गांधी आणि माझा सामाईक मंत्र आहे. तेही डरो मत म्हणतात आणि मीही म्हणतो घाबरू नका. हे आमचं मैत्रीचं नातं आहे.”

हेही वाचा : Video: चार महिने टीशर्ट घातल्यानंतर काश्मीरमध्ये पोहोचताच राहुल गांधी जॅकेटमध्ये; सोबतीला संजय राऊतही

“काहीही झालं तर वाकायचं नाही, झुकायचं नाही. हुकुमशाहीसमोर मरण मत्करू, असा हा आमचा मंत्र आहे. हा माझा स्वभाव त्यांना आधीपासून आवडतो. आत्ताही मला मिठी मारल्यावर ते मला त्याच पद्धतीने बोलले की, मी तुम्हाला फार मानतो,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-01-2023 at 14:14 IST

संबंधित बातम्या