उत्तर प्रदेशमधील लखमीपूर खेरी येथील हिंसाचाराच्या घटनेनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीवरून विविध तर्कवितर्क सुरू आहेत. कारण, या भेटीमागे नेमका काय हेतू होता. नेमकी काय चर्चा झाली, याबाबतची सगळ्यांनाच उत्सुकता होती. संजय राऊत यांनी देखील या भेटीनंतर माध्यामांना थेट प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, या भेटीत राहुल गांधी नेमकं काय म्हणाले, हे सांगतानाचा संजय राऊत यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये संजय राऊत यांनी राहुल गांधी बरोबरच काँग्रेसची स्तुती देखील केली आहे.

संजय राऊत म्हणातात, “राहुल गांधींशी माझी चर्चा झाली. राहुल गांधींशी मी यासाठी चर्चा करत असतो कारण ते देशातील प्रमुख विरोधी पक्षाचे मुख्य नेते आहेत आणि काँग्रेसशिवाय या देशात विरोधकांचं एक पान देखील हलू शकत नाही. मग कुणी काहीही म्हणो. आजही गावागावात काँग्रेस आहे. मग निवडणुकीत निकाल काही लागो. मात्र एकच पक्ष आहे जो संपूर्ण देशात उभा आहे, एक शिवसेना व दुसरी काँग्रेस.”

तसेच, “राहुल गांधी यांनी माझ्याशी मोकळेपणाने चर्चा केली. आम्ही दोघेही अशा स्वभावाची लोकं आहोत की, दोघेही मोकळेपणाने बोलतो. आमच्या दोघाचं चांगल्याप्रकारे जमतं देखील. राहुल गांधींनी म्हटलं की, जसं तुम्ही म्हणालात वादळ येणार आणि वादळ येणारचं.” असंही यावेळी संजय राऊत यांनी सांगितलं.

संजय राऊत म्हणतात, “विरोधकांनी एकत्र येण्याची गरज; राहुल गांधीची घेणार भेट”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“लखीमपूर खेरी येथे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसोबत झालेल्या हिंसाचाराचाच्या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. त्यातच, उत्तर प्रदेश सरकारने प्रियांका गांधींना अटक केली आहे. अशावेळी एकजुटीने काम करण्याची आवश्यकता असून मी आज याबाबत राहुल गांधी यांची भेट घेईन”, असं ट्विट संजय राऊत यांनी भेट घेण्याअगोदर केलं होतं.