नवी दिल्ली : एका व्यक्तीला अटक करण्याच्या हेतूने ठरवून अमली पदार्थ ठेवल्याप्रकरणी माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांच्याविरुद्ध कनिष्ठ न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत न्यायाधीश पक्षपातीपणा करीत असल्याचा आक्षेप घेणाऱ्या तीन याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावल्या. या प्रत्येक याचिकेबद्दल एक लाख याप्रमाणे एकूण तीन लाख रुपयांचा दंडही भट्ट यांना ठोठावण्यात आला.
न्या. विक्रम नाथ आणि न्या. राजेश बिंदल यांनी हा निर्णय देताना दंडाची रक्कम गुजरात उच्च न्यायालयाच्या वकील संघटनेकडे जमा करण्यास सांगितले.भट्ट यांना फटकारताना न्यायालय म्हणाले की, तुम्ही किती वेळा सर्वोच्च न्यायालयात आला आहात? किमान दहा-बारा वेळा तरी आला आहात.




हेही वाचा >>>“पारदर्शक आणि निष्पक्ष राहा, सूड भावनेनं कारवाई नको”, सुप्रीम कोर्टाची ईडीवर तिखट टिप्पणी
भट्ट यांनी केलेल्या एका याचिकेत या प्रकरणाची सुनावणी अन्य सत्र न्यायालयात करण्याची मागणी केली होती. संबंधित न्यायाधीश पक्षपाती असल्याचा आरोप त्यांनी केला होता. दुसऱ्या एका याचिकेत त्यांनी कनिष्ठ न्यायालयातील सुनावणीचे ध्वनिचित्रमुद्रण करण्याची मागणी केली होती.