सरदार पटेल मुस्लीमविरोधी नव्हते -अडवाणी

पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची प्रतिमा निधर्मी राष्ट्रवादी म्हणून रंगविण्याच्या नादात सरदार पटेल यांना संकुचित विचारांचे व मुस्लीमविरोधी ठरविले जात

पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची प्रतिमा निधर्मी राष्ट्रवादी म्हणून रंगविण्याच्या नादात सरदार पटेल यांना संकुचित विचारांचे व मुस्लीमविरोधी ठरविले जात असल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी मंगळवारी तीव्र आक्षेप घेतला आहे. सरदार पटेल हे मुस्लीमविरोधी नव्हते, असे ठामपणे नमूद करताना त्यांनी इस्लामी विचारवंत व काँग्रेस नेते रफिक झकेरिया यांच्या लिखाणाचाही संदर्भ दिला आहे.
आपल्या ब्लॉगवरून अडवाणी यांनी हे विचारमंथन केले आहे. नेहरू हे निधर्मी राष्ट्रवादी होते तर पटेल हे मुस्लीमविरोधी होते. त्यामुळे संघपरिवार एकाचा द्वेष करतो तर दुसऱ्याची पूजा करतो, अशी विधाने एका ख्यातकीर्त मासिकाच्या लेखात आली आहेत. त्यांचा समाचार घेताना अडवाणी यांनी, ‘सरदार पटेल व भारतीय मुसलमान’ या झकेरिया यांच्या लेखमालेचा आधार घेतला आहे. पटेलांबद्दलचे आपले पूर्वदूषित मत कसे बदलले, हे या लेखात झकेरिया यांनी मांडले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sardar patel was not anti muslim advani