सतीश कौशिक यांचा मृत्यू झाला ज्यामुळे संपूर्ण हिंदी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. हिंदी सिनेसृष्टीतल्या नावाजलेल्या दिग्दर्शकांमध्ये त्यांची गणती होते. सतीश कौशिक यांच्या मृत्यूनंतर एक नाव चर्चेत आलं आहे ते नाव आहे विकास मालू. देशातल्या बहुतांश लोकांनी विकास मालू हे नाव पहिल्यांदा ऐकलं असेल. सतीश कौशिक यांच्या मृत्यूनंतर विकास मालू यांच्या दुसऱ्या पत्नीने हा सगळा एका कटाचा भाग आहे असं म्हटलं आहे.

विकास मालू यांच्या पत्नीने काय आरोप केला आहे?

विकास मालू यांच्या दुसऱ्या पत्नीने सतीश कौशिक यांचा मृत्यू हा एक कट असल्याचा दावा केला आहे. या दरम्यान या महिलेने दिल्ली पोलिसांना दिलेल्या तक्रारीत या महिलेने असं म्हटलं आहे विकास मालूने गुंतवणुकीसाठी सतीश कौशिक यांच्याकडून १५ कोटी रूपये घेतले होते. सतीश कौशिक गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्याकडे पैसे मागत होते. मात्र विकास मालू ते परत करत नव्हते असंही या महिलेने म्हटलं आहे.

Drug trafficker Shirazi case
अमली पदार्थ तस्कर शिराझी प्रकरण : साडेपाच कोटींच्या मालमत्तेवर ईडीची टाच
personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
nilesh rane paid 25 lakhs to pune municipal corporation to settle the tax dues
पुणे: निलेश राणे यांच्यासाठी महापालिकेच्या पायघड्या; अवघे २५ लाख भरल्यानंतर मिळकतकराची थकबाकी शून्य
Best Bus Monthly Pass Rate Increase Mumbai
बेस्टचा पास महागला; पासधारकांच्या खिशाला कात्री

विकास मालू यांनी फेटाळले आरोप

या महिलेने असा दावा केला आहे विकास मालू यांनीच मला हे सांगितलं होतं की सतीश कौशिक यांच्याकडून १५ कोटी रूपये करोना काळात घेतले होते. ते बुडाले, आता सतीश कौशिक पैसे परत मागत होते. महिलेने हा आरोपही केला आहे. विकास मालू यांना उधार घेऊन पैसे द्यावे लागू नये म्हणूनच त्यांनी सतीश कौशिक यांना आपल्या मार्गातून दूर केलं. मात्र विकास मालू यांनी हे आरोप फेटाळले आहेत. विकास मालू यांनी म्हटलं आहे की सतीश कौशिक यांच्याशी आणि त्यांच्या कुटुंबाशी ३० वर्षांपासूनचे संबंध आहेत. सतीश कौशिक यांच्या मृत्यूमुळे आम्हालाही धक्का बसला आहे असं विकास मालू यांनी म्हटलं आहे. आता सतीश कौशिक यांच्या मृत्यूनंतर मला विनाकारण बदनाम केलं जातं आहे असं विकास मालू यांनी म्हटलं आहे.

कोण आहेत विकास मालू?

सतीश कौशिक यांच्या मृत्यूनंतर विकास मालू हे नाव चर्चेत आलं आहे. उद्योग जगतातलं मोठं नाव आहे. कुबेर ग्रुप या प्रसिद्ध ग्रुपचे मालक विकास मालू आहेत. कुबेर ग्रुपने खैनीच्या व्यवसायासह सुरूवात केली होती. सध्या हा ग्रुप ४५ व्यवसायांमध्ये कार्यरत आहे आणि ५० देशांमध्ये या ग्रुपचा व्यवसाय चालतो. विकास मालू हे एक उत्तम उद्योजक म्हणून ओळखले जातात. कुबेर अॅक्वा मिनिरल्स प्रायव्हेट लिमिटेडमद्ये ते संचालक होते. त्यानंतर सध्या ते वर्धमान इंटरनॅशन प्रायव्हेट लिमिटेड मध्ये संचालक आहेत.

कुबेर ग्रुपची सुरूवात कशी झाली?

१९८५ मध्ये कुबेर ग्रुपची सुरूवात विकास मालू यांचे वडील मूलचंद मालू यांनी केली होती. सुरूवातीला खैनीच्या व्यवसायात असणारा हा ग्रुप तंबाखू व्यवसायातला सर्वात मोठा ब्रांड आहे. कंपनीचे देशभरात १४ लाख व्हेंडर आहेत. तसंच या कंपनीची उत्पादनं बाहेरच्या देशांमध्येही पाठवली जातात.

विकास मालूंनी उभं केलं कुबेर ग्रुपचं साम्राज्य

या शिवाय कुबेर ग्रुप मसाले, चहा पावडर, हिंग, डाळी, तांदूळ, लोणचे, पापड, केशतेल, धूप-अगरबत्ती, सुपारी, माऊथ फ्रेशनर या उत्पादनांच्या व्यवसायातही आहे. कुबेर मार्ट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडला यशाच्या शिखरावर नेण्याचं सगळं श्रेय जातं ते विकास मालू यांना. सध्या सतीश कौशिक यांच्या मृत्यूनंतर विकास मालू हे नाव चर्चेत आलं आहे. विकास मालू यांनीच सतीश कौशिक यांच्या मृत्यूचा कट रचल्याचं बोललं जातं आहे. मात्र विकास मालू यांनी हे सगळे आरोप फेटाळले आहेत.