scorecardresearch

‘सत्येंद्र जैन यांच्या चित्रफितींमागे केजरीवालांचे निकटवर्तीय’

जैन तिहार कारागृहात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठीच्या  सुविधांचा लाभ घेत असलेल्या चित्रफितींची मालिका प्रसृत झाली आहे.

‘सत्येंद्र जैन यांच्या चित्रफितींमागे केजरीवालांचे निकटवर्तीय’
जैन तिहार कारागृहात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठीच्या  सुविधांचा लाभ घेत असलेल्या चित्रफित

नवी दिल्ली : आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सध्या तिहार कारागृहात असलेले दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह चित्रफितींची मालिका सुरू आहे. त्यामागे आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांच्या निकटवर्तीयांचा हात आहे. ही मंडळी जैन यांच्या चित्रफिती आणि माहिती प्रसृत करत असल्याचा आरोप भाजपने रविवारी केला. या आरोपावर ‘आप’ने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी  सांगितले, की जैन तिहार कारागृहात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठीच्या  सुविधांचा लाभ घेत असलेल्या चित्रफितींची मालिका प्रसृत झाली आहे.

केजरीवाल या मुद्दय़ावर धादांत खोटे बोलत असल्याचा आरोप करून पात्रा म्हणाले, की रविवारी जैन यांची आणखी एक नवीन चित्रफीत समोर आली. यात दहा जण जैन यांची कोठडी साफ करताना दिसत आहेत. ही कथित चित्रफीत दाखविल्यानंतर पात्रा यांनी दावा केला, की जैन यांच्या या कोठडीची स्वच्छता ठेवण्याचे काम दहा जणांना देण्यात आले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 02:36 IST

संबंधित बातम्या