सौदी अरेबियामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सौदी अरेबियाच्या रास तनुरा शहरात एक हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे सौदी अरेबियामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या हेलिकॉप्टर अपघाताच्या घटनेनंतर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या या अपघातात मृत्यू झालेले सर्वजण सौदीचे नागरिक होते अशी माहिती सांगितली जात आहे. दरम्यान, अमेरिका-इस्रायल आणि इराण संघर्षामुळे जवळपास चार महिन्यांपासून अरामकोने कच्च्या तेलाची वाहतूक बंद ठेवली होती. मात्र, शुक्रवारी अरामकोने रास तनुरा टर्मिनलवर कच्च्या तेलाची वाहतूक पुन्हा सुरू केली होती. मात्र, यावेळी अरामकोचं एक हेलिकॉप्टर अचानक कोसळून भीषण अपघात झाला.
दरम्यना, या हेलिकॉप्टरच्या अपघाताचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पण या अपघाताच्या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. सौदी अरेबियाच्या ऊर्जा मंत्रालयाने एका निवेदनात म्हटलं की, संबंधित अधिकाऱ्यांकडून अपघाताचं कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. मंत्रालयाने मृतांच्या कुटुंबीयांबद्दल शोक व्यक्त करत मनापासून संवेदना व्यक्त केल्या आहेत. सौदी प्रेस एजन्सीच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसने या संदर्भातील वृत्त दिलं आहे.
صرح مصدر مسؤول في وزارة الطاقة أنه في يوم الأحد سقطت طائرة مروحية تابعة لشركة أرامكو السعودية برأس تنورة، وقد نتج عن الحادث استشهاد جميع ركابها، وعددهم (14) وجميعهم من المواطنين السعوديين رحمهم الله.
— عبدالرحمن الروقي ?? (@Alotaibi_2030_) June 28, 2026
الله يرحمهم ويغفرلهم ويتقبلهم مع الشهداء . pic.twitter.com/rHIqOqigCA
सौदी अरेबियाच्या आखाती किनारपट्टीवर वसलेलं रास तनुरा हे एक प्रमुख तेल आणि औद्योगिक केंद्र आहे. सरकारी तेल कंपनी सौदी अरामकोच्या महत्त्वाच्या सुविधांचं हे एक मुख्य ठिकाण आहे. अपघात झालेलं हे हेलिकॉप्टर जगातील सर्वात मोठी तेल कंपनी सौदी अरामको होतं. सौदी अरामको ही जगातील सर्वात मोठ्या तेल आणि वायू कंपन्यांपैकी एक आहे.
