सौदी अरेबियात गेल्या १० दिवसांत अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्याखाली १२ जणांना फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. यामध्ये काहीजणांचा तलवारीने शिरच्छेद करण्यात आल्याची माहिती आहे. ‘टेलिग्राफ’ने दिलेल्या वृत्तानुसार, अंमली पदार्थांचा वापर केल्याप्रकरणी कारावासाची शिक्षा झालेल्या एकूण १२ जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. यामध्ये तीन पाकिस्तानी, चार सीरियन, दोन जॉर्डियन आणि तीन सौदी नागरिक होते.

यावर्षी मार्च महिन्यात सौदी अरेबियाने तब्बल ८१ लोकांना फाशी दिली होती. सौदी अरेबियाच्या आधुनिक इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई होती. हे लोक हत्या, दहशतवादी गटाशी संबंध तसंत वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये सहभागी होते.

Kerala crowdfunding story
मृत्यूदंडाची शिक्षा माफ करण्यासाठी केरळच्या जनतेने जमवले ३४ कोटी; लोकवर्गणीतून जमा केला ‘ब्लड मनी’
Nagpur Police, 11 Robbers, Three Crore Rupee Jewelry Heist, robbery in nagpur, nagpur robbery, crime in nagpur, one woman hostage by robbers,
एकटी राहणारी महिला; तीन कोटींच्या दागिन्यांची लूट, हजार सीसीटीव्ही…
Case against five persons in case of death of worker due to crane hook falling on head
पुणे : डोक्यात क्रेनचा हुक पडून कामगाराच्या मृत्यूप्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा
Punjab Girl, 10, Dies After Eating Cake Ordered Online On Her Birthday
वाढदिवसाला ऑनलाईन मागवलेला केक खाल्ल्याने दहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू, कुठे घडली घटना?

सौदी अरेबियाने अशा प्रकारच्या शिक्षा कमी करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र दोन वर्षांनी पुन्हा एकदा सौदी अरेबियाने टोकाची शिक्षा दिली आहे. क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या यांनी २०१८ मध्ये तुर्कीमध्ये अमेरिकन पत्रकार जमाल खशोग्गी यांची हत्या झाल्यानंतर त्यांनी हे आश्वासन दिलं होतं. सौदी प्रशासनाने केवळ खून किंवा हत्याकांडात दोषी आढळलेल्यांनाच फाशीची शिक्षा दिली जाईल सांगत शिक्षा कमी करण्याचा प्रयत्न केला होता.