Iran – US Israel War : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्या युद्धाचे पडसाद थेट सौदी अरेबियातली अरामको रिफायनरीपर्यंत पोहचले आहेत. रॉयटर्सच्या वृत्तानुसार सौदी अरेबियातील सरकारी तेल कंपनी असलेल्या अरामकोवर ड्रोन हल्ला केला. अरामको ही जगातली सर्वात मोठी रिफायनरी आहे. या कंपनीवर ड्रोन हल्ला करण्यात आल्याने कंपनीला आग लागली आहे. तसंच कंपनी बंदही करण्यात आली असून आग नियंत्रणात आणण्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत. घटनास्थळावरुन आगीचे लोळ आणि धुराचे लोट दिसून येत आहेत.

रास तनुरा रिफायनरी तूर्तास बंद

रॉयटर्सच्या वृत्तानुसार एका अधिकाऱ्याने सांगितलं की सावधगिरीचा उपाय म्हणून अरामकोची रास तनुरा रिफायनरी तूर्तास बंद, सध्या आग नियंत्रणात णली आहे. सोशल मीडियावर जे व्हिडीओ व्हायरल होत आहेत त्यात आगीचे लोळ आणि धुराचे लोट दिसत आहेत. २८ फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलने संयुक्त कारवाई करत इराणवर हल्ला केला ज्यानंतर आखाती भागात युद्ध सुरु झालं. यानंतर जगात कच्च्या तेलाच्या किंमतीही महाग झाल्या आहेत. लंडनमध्ये कच्च्या तेलाची किंमत जवळपास १० टक्क्यांनी वाढली. अशा घटना जगात घडत असताना रिफायनरीला आग लागणं ही घटना जगातल्या तेल बाजारपेठांसाठी चांगली नाही.

अरामको कंपनी का महत्त्वाची आहे?

जगात जेव्हा रिफायनरीजचं नाव घेतलं जातं तेव्हा एक नाव सर्वात वर असतं ते म्हणजे सौदी अरामको कंपनी. जगातल्या सर्वात मोठ्या रिफायनरीज पैकी एक अशी ही कंपनी आहे. ही फक्त एक कंपनी नाही तर सौदी अरेबियाची अर्थव्यवस्थेचा कणा आहे असं म्हटलं तर मुळीच वावगं ठरणार नाही. सौदी अरामको कंपनीला जगात महत्त्व आहे. ड्रोन हल्ला करण्यात आल्याने या ठिकाणी रिफायनरीला आग लागली. आग सीमित स्वरुपाची होती त्यामुळे ती नियंत्रणात आणण्यात आली. आहे. फायर फायटिंग सिस्टिम आणि आपात्कालीन दलांनी दाखवलेली तत्परता त्यामुळे ही आग तातडीने नियंत्रणात आणण्यात आली.

अरामको कंपनी १९३३ ला सुरु झाली

अरामको कंपनी १९३३ ला सुरु झाली होती. या कंपनीचा पाया अमेरिकेच्या भागिदारीनंतर रचला गेला होता. १९८० च्या दशकापर्यंत कंपनीचं संपूर्ण अधिग्रहण सौदी सरकारने केलं. या ठिकाणी ७५ हजार लोक काम करतात. या कंपनीची मार्केट कॅप १.६-१.७ ट्रिलियन डॉलर्सच्या आसपास आहे. याला कुबेराचा खजिना असंच म्हटलं आहे. ही कंपनी सरासरी १० ते १२ मिलियन बॅरल कच्च्या तेलाचं उत्पादन करते.