पीटीआय, नवी दिल्ली : ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे निर्भय वृत्तीचे आणि स्वाभिमानी व्यक्तिमत्त्व होते. गुलामगिरी कदापिही मान्य नसलेली त्यांची मानसिकता होती,’’ असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी काढले. ‘मन की बात’ या संवादसत्रात त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीदिनानिमित्त त्यांना अभिवादन केले.
मोदी म्हणाले, की आज २८ मे. थोर स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकर यांची जयंती. सावरकरांचे बलिदान, धैर्य आणि दृढनिश्चय आपल्याला सतत प्रेरणा देत राहील. त्यांच्या पराक्रमाच्या कथा, धैर्य आणि संकल्प आजही आपल्या सर्वासाठी प्रेरणादायी आहे. वीर सावरकरांना ज्या अंदमानातील कोठडीत अनेक वर्षे ठेवले होते, त्यांनी काळय़ा पाण्याची खडतर शिक्षा भोगली होती, तेथे मी भेट दिली. तो दिवस मी कधीही विसरू शकणार नाही.
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Savarkars fearless attitude self respecting personality prime minister modi statement in mann ki baat ysh