SBI Bank Strike May 2026 Impact: State Bank of India services to be affected by nationwide employee strike in May : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया(SBI)च्या कोट्यवधी ग्राहकांना मोठा धक्का बसण्याची चिन्हे आहेत. कारण एसबीआयचे कर्मचारी मे महिन्यात दोन दिवसांच्या संपावर जाणार आहेत. हा संप दोन दिवस चालणार आहे, मात्र यामुळे बँका सलग चार दिवस बंद राहतील. कर्मचारी यूनियन २५ आणि २६ मे २०२६ रोजी कर्मचारी संपावर जातील. २५ मे रोजी सोमवार आहे आणि २६ मे रोजी मंगळवार. मात्र त्यापूर्वी २३ मे रोजी महिन्यातील चौथा शनिवार असल्याने आणि २५ मे रोजी रविवार असल्याने बँक थेट ४ दिवस बंद असणार आहे.

एसबीआयचे कर्मचारी संप का करत आहेत?

हा संप ‘ऑल इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ फेडरेशन’ (AISBISF) पुकारला आहे. बँक कर्मचार्‍यांच्या या संपामध्ये वर्कमेन श्रेणीतील कर्मचारी सहभागी होणार आहेत. कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असून करारांची योग्य अंमलबजावणी केली जात नाही, असा आरोप फेडरेशनने केला आहे.

AISBISF च्या मते कर्मचाऱ्यांच्या अधिकार हळूहळू कमकूवत केले जात आहेत. अनेक निर्णय चर्चा न करताचा लागू गेले जात आहेत आणि कर्मचाऱ्यांच्या मतांकडे दुर्लक्ष केले जात आहे. फेडरेशनने २ मे २०२६ रोजी एसबीआयचे चेअरमन यांना नोटीस पाठवून सांगितले आहे की, हा संप इंडस्ट्रीयल डिस्प्यूट्स अॅक्ट १९४७ अंतर्गत केला जाईल. जर या तारखेला एखादी सुट्टी आली तर हा संप २७ मे रोजी होईल.

कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय आहेत?

फेडरेशनने एकूण १६ मागण्या मांडल्या आहेत, ज्यामध्ये नोकरी, पेन्शन, पदोन्नती आणि कामाच्या ठिकाणच्या सुविधांशी संबंधित मुद्द्यांचा समावेश आहे. फेडरेशनने म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून मेसेंजरची भरती बंद आहे, ज्यामुळे हे पद जवळपास संपुष्टात आले आहे. यामुळे गरीब आणि कमकुवत घटकांतील लोकांसाठी नोकरीच्या संधीही कमी झाल्या आहेत. याबरोबरच बँकेत सशस्त्र रक्षकांच्या कमतरतेबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. नुकतीच सुरत येथील एसबीआय शाखेत झालेल्या लुटीच्या घटनेचा संदर्भ देत, सुरक्षेतील हलगर्जीपणा धोकादायक ठरू शकतो, असेही यात नमूद करण्यात आले आहे.

नेमक्या मागण्या काय आहेत?

  • मेसेंजर (सहायक स्टाफ) भरतीसुरू करण्यात यावी.
  • सशस्त्र रक्षक यांची भरती करण्यात यावी.
  • NPS कर्मचाऱ्यांना पेन्शन फंड मॅनेजर बदलण्याचा पर्याय उपलब्ध व्हावा.
  • २०१९ नंतर भरती झालेल्या कर्मचार्‍यांना इंटर सर्कल ट्रान्सफरची सुविधा मिळावी.
  • कायमस्वरूपी नोकऱ्यांमधील आउटसोर्सिंग बंद करण्यात यावे.
  • पुरेशा स्टाफची भरती करण्यात यावी.
  • वेतनातील असमानता दूर करण्यात यावी.
  • करिअर प्रोग्रेशन स्कीमचा फेरआढावा घेण्यात यावा.
  • निवृत्त कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढीचा फायदा मिळावा.
  • वैद्यकीय खर्च आणि रिइम्बर्समेंट प्रक्रियेत सुधारणा व्हावी.
  • पेन्शनमध्ये सर्व वेतन घटकांचा समावेश करण्यात यावा.
  • HRMS प्रणालीमधील अडचणी दूर करण्यात याव्यात.
  • वर्कमेन डायरेक्टरची नियुक्ती करण्यात यावी.
  • PF ट्रस्टीसाठी प्रतिनिधी नियुक्त केला जावा.
  • क्रॉस-सेलिंगच्या नावाखाली चुकीची उत्पादने विकण्यावर बंदी घालण्यात यावी.

एनपीएस आणि पेन्शनशी संबंधित मागण्या

कर्माचाऱ्यांनी नॅशनल पेन्शन सिस्टमशी संबंधित मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, त्यांना पेन्श फंड मॅनेजर बदलण्याचा पर्याय मिळत नाही, तर दुसऱ्या सरकारी बँकांमधील कर्मचाऱ्यांना ही सुविधा मिळते. यामुळे त्यांच्या रिटायरमेंट सेव्हिंग्जवर प्रभाव पडतो. फेडरेशनने वेतनातील असमानता ही देखील मोठी समस्या असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मते येथे अधिकाऱ्यांना अतिरिक्त स्पेशल पे देऊन त्यांची सॅलरी वाढवण्यात आली आहे, तर वर्कमेन कर्माचऱ्यांच्या वेतनातील वाढ ही मर्यादित आहे.

ग्राहकांवर काय प्रभाव पडणार?

जर संप झाला तर २५ आणि २६ मे रोजी बँकिंग सेवांवर प्रभाव पडेल. कॅश ट्रांजेक्शन्स, चेक क्लियरंन्स आणि इतर सेवांना उशीर होऊ शकतो. मात्र, या कालावधीत ऑनलाइन सेवा सुरू राहण्याची शक्यता आहे.