scorecardresearch

Privacy issue : युजर्सचा डेटा WhatsApp फेसबुकला देऊ शकते का? सर्वोच्च न्यायालय घेणार निर्णय, तारीखही ठरली

न्यायमूर्ती केएम जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडेल.

Privacy issue : युजर्सचा डेटा WhatsApp फेसबुकला देऊ शकते का? सर्वोच्च न्यायालय घेणार निर्णय, तारीखही ठरली
संग्रहित

व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन गोपनीयता धोरणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर १७ जानेवारी २०२३ रोजी अंतिम सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती केएम जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडेल.

हेही वाचा – “विवाहित असो किंवा अविवाहित प्रत्येक महिलेला सुरक्षित गर्भपाताचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

कर्मण्य सिंग सरीन आणि श्रेया सेठी या दोन विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन गोपनीयता धोरणाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. व्हॉट्सअ‍ॅपकडून तिची पॅरेंट कंपनी फेसबुकला युजर्सची वैयक्तिक माहिती देणे चुकीचे आहे. हे त्यांच्या गोपनीयतेचे उल्लंघन आहे. सोशल मीडिया कंपन्यांनी युजर्सच्या वैयक्तिक डेटाबाबत मनमानी करू नये, असे या विद्यार्थ्यांनी याचिकेत म्हटले होते.

दरम्यान, आज या प्रकरणावरील सुनावणी पार पडली. यावेळी न्यायमूर्ती केएम जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने दोन्ही पक्षांना १५ डिसेंबरपर्यंत आपले म्हणणे मांडावे, असे निर्देश दिले. तसेच या प्रकरणाची अंतिम सुनावणी १७ जानेवारी २०२३ रोजी घेण्यात येईल, असेही न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा- पंतप्रधान मोदी उद्या ‘मुंबई – गांधीनगर वंदे भारत एक्सप्रेस’ला दाखवणार हिरवा झेंडा

काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सअ‍ॅपने त्यांचे नवीन गोपनीयता धोरण जारी केले होते. या नवीन धोरणांनुसार युजर्सची वैयक्तिक माहिती त्यांच्याच इतर कंपनीला देणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच हे नवीन धोरण फक्त व्यवसाय खात्यांसाठी असल्याचेही व्हॉट्सअ‍ॅपने सांगितले होते. मात्र, यावरून मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या