मार्च २०१४ पासून सुब्रतो रॉय तिहार कारागृहात आहेत. त्यांच्याकडून अनेकवेळा जामिनासाठी न्यायालयाकडे अर्ज करण्यात आले होते.
गेल्या दोन वर्षांपासून तिहार तुरुंगात असलेले सहारा समुहाचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने चार आठवड्यांसाठी पॅरोलवर कारागृहातून बाहेर जाण्याची मुभा दिली. सुब्रतो रॉय यांच्या मातोश्रींचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. त्यामुळे अंत्यसंस्कार आणि उर्वरित विधींसाठी चार आठवड्यांसाठी त्यांना कारागृहातून सोडावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
SC directs release of jailed Sahara chief Subrata Roy on parole for four weeks to attend rituals following the death of his mother early thi
मार्च २०१४ पासून सुब्रतो रॉय तिहार कारागृहात आहेत. त्यांच्याकडून अनेकवेळा जामिनासाठी न्यायालयाकडे अर्ज करण्यात आले होते. पण प्रत्येकवेळी न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळून लावला होता. हजारो गुंतवणूकदारांकडून गोळा केलेले पैसे परत देण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेले असतानाही ते परत न केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. दहा हजार कोटी रुपये जमा केल्यावर त्यांना जामीन देण्याचे न्यायालयाने निश्चित केले होते. पण तो पैसा उभारण्यात सहारा समूह अपयशी ठरला होता.