जागतिक बँकेचे जागतिक शिक्षण निर्देशक जॅमे सावेद्रा यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद ठेवण्यात आता काहीच अर्थ नसल्याचं म्हटलं आहे. करोनाच्या नवीन लाटा येत राहिल्या तरी शाळा बंद करणे हा शेवटचा पर्याय हवा असं सावेद्रा म्हणालेत. सावेंद्र यांची टीम करोनाच्या साथीचा शिक्षण क्षेत्रावर होणाऱ्या परिणामांवर बारीक लक्ष ठेऊन आहेत. शाळा सुरु केल्याने करोना रुग्णांची संख्या वाढलीय, असं दिसलेला एकही पुरवा उपलब्ध नाहीय, असं सावेद्रा म्हणालेत. शाळा या करोना संसर्गाचं ठिकाण आहे किंवा त्या करोनाच्या कालावधीमध्ये असुरक्षित आहेत असं काहीही नसल्याचं सावेद्रा यांनी स्पष्ट केलंय. लोकहिताचा विचार करताना मुलांचं लसीकरण पूर्ण होईपर्यंत वाट बघण्यात काहीही अर्थ नसल्याचं सावेद्रा यांनी म्हटलंय. करोना कालावधीमध्ये शाळा बंद ठेवण्यामागे कोणतेही वैज्ञानिक कारण नसल्याचा दावाही त्यांनी केलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वॉशिंग्टनमधून पीटीआयने दिलेल्या वृत्तामध्ये सावेद्रा यांनी केलेल्या वक्तव्यांचा उल्लेख आहे. “शाळा सुरु करणे आणि करोनाचा प्रादुर्भाव होणे या दोन्ही गोष्टींमध्ये काहीच संबंध नाहीय. दोघांचा संबंध असल्याचा कोणताही पुरुवा उपलब्ध नाहीय. त्यामुळे आता शाळा बंद ठेण्यामागे काहीच अर्थ नाहीय. करोनाच्या नवीन लाटा आल्या तरी शाळा बंद ठेवणं हा सर्वात शेवटचा पर्याय हवा,” असं सवेद्रा म्हणालेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: School closures in view of covid not justified world bank education director jaime saavedra scsg
First published on: 17-01-2022 at 08:55 IST