स्कॉर्पिअन पाणबुड्यांची माहिती लीक नव्हे तर चोरी झाली: फ्रेंच सूत्र

२०११ मध्ये फ्रान्स डीसीएएस कंपनीमध्ये कार्यरत असणाऱ्या नौदल कर्मचाऱ्यांने माहीत चोरली होती.

भारतीय नौदलासाठी बनवण्यात आलेल्या स्कॉर्पिअन या पानबुड्यांबद्दलची गोपनीय माहिती चोरी झाल्याचा दावा  फ्रेंच सरकारच्या सूत्रांनी केला आहे.  सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फ्रान्सच्या डीसीएनएस या कंपनीत कार्यरत असणाऱ्या नौदल कर्मचाऱ्यांने  २०११ मध्ये ही माहिती चोरल्याचे  म्हटले आहे. या फ्रान्स कर्मचाऱ्याचे भारतामध्ये प्रशिक्षण सुरु असताना त्याची कामावरुन हाकलपट्टीही देखील केल्याचे सूत्रांकडून समजते. तसेच चोरी झालेले दस्ताऐवज गोपनिय नसल्याचे देखील फ्रान्स सूत्रांनी स्पष्ट केले. भारतीय नौदलासाठी बनवण्यात आलेल्या स्कॉर्पिअन या पानबुड्यांबद्दलची गोपनीय माहिती भारतातून लीक झाली नसल्याचे भारतीय नौदलाने स्पष्ट केले आहे.  फ्रान्स सरकारशी संपर्क साधून या प्रकरणाची चौकशी करण्याचे तसेच चौकशी अहवाल भारताकडे देण्याची मागणी नौदलाकडून करण्यात आली आहे. स्कॉर्पिअन पानबुड्यांबद्दल उघड झालेली माहितीसुरक्षेच्या दुष्टीने कोणतेही नुकसान पोहचविणारी नसल्याचेही भारतीय नौदलाने यापूर्वी  स्पष्ट केले होते.  ज्या फ्रान्स कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे त्यांच्याकडूनही लीक प्रकरणातील अहवाल मागवण्यात आला आहे. स्कॉर्पिअन पाणबुड्याबद्दलची २२ हजार पानांची गोपनीय माहिती लीक झाल्याचे  वृत्त ऑस्ट्रेलियन माध्यमांनी समोर आणले होते. तसेच भारतीय पाणबुड्याबद्दलची माहिती ही भारतातूनच लीक झाली असल्याचा दावा या माध्यमांनी केला होता. त्यानंतर संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश नौदल प्रमुखांना दिले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Scorpene submarine documents stolen not leaked

ताज्या बातम्या