नासाच्या केप्लर दुर्बिणीने आतापर्यंत वेगळ्या ताऱ्यांभोवती फिरणारे १०० ग्रह शोधून काढले आहेत. केप्लर दुर्बिणीत अलीकडे तांत्रिक बिघाड झाला होता पण नंतर ती दुरुस्त करण्यात आली. के २ मोहिमेत ती दुरुस्त करण्यात आली. या दुर्बिणीने अधिक्रमणाच्या माध्यमातून ग्रह शोधून काढले यात ग्रह मातृताऱ्यासमोरून जातो तेव्हा प्रकाश अडला जातो, त्यावरून ग्रहांचे अस्तित्व कळते. यात अधिक जास्त अधिकृतता असावी लागते. मे २०१३ मध्ये केप्लर दुर्बीण नादुरुस्त झाली होती व त्याचे ओरिएंटेशन व्हील खराब झाले होते. तरी केप्लर चमूने लगेच दोष शोधून दुर्बीण दुरुस्त केली. सौर प्रारणांच्या दाबाचा वापर तिसरे चाक म्हणून करण्यात आला.

ही अवकाशदुर्बीण आकाशाचा मोठा पट्टा ८० दिवस बघत असते व त्यातून ग्रह व इतर घटकांचा शोध लागला आहे, असे स्पेस डॉट कॉम या संकेतस्थळाने म्हटले आहे. पहिल्या पाच के २ मोहिमांत १०० बाह्य़ग्रहांचा शोध लागला, असे अ‍ॅरिझोना विद्यापीठाचे आयन क्रासफील्ड यांनी सांगितले. केप्लर मोहिमेत अनेक ग्रहांचा शोध लागला. एकूण ६० हजार तारे व सात हजार अधिक्रमणे यांचे ऐंशी दिवसांतील पहिल्या पाच दिवसांत निरीक्षण करण्यात आले. या बाह्य़ग्रहांच्या शोधाची खात्री वेगवेगळ्या निकषांनी पटवण्यात आली. यात अंदाज चुकण्याची शक्यता एक टक्का होती. केप्लर दुर्बीण २००९ मध्ये अवकाशात सोडण्यात आली. त्याचे मुख्य उद्दिष्ट बाह्य़ग्रहांचा शोध घेणे हे होते. त्यात पृथ्वीसदृश ग्रह शोधण्यात आले.

आकाशगंगेत असे अनेक  तारे आहेत ज्यांच्या भोवती हे ग्रह फिरत असतात. केप्लर मोहीम कमालीची यशस्वी झाली. आपल्या पलीकडे १००० तारे दिसून आले. बाह्य़ग्रहांपैकी निम्मे या दुर्बिणीच्या मदतीने शोधण्यात आले आहेत.