scorecardresearch

सुरक्षाविषयक आव्हानांचा एकत्रित मुकाबला; नवे संरक्षण दलप्रमुख जनरल अनिल चौहान यांचा निर्धार

देशाच्या सुरक्षेला असलेली आव्हाने आणि अचडणींचा तिन्ही संरक्षण दलांच्या एकत्रित सामर्थ्यांच्या बळावर आपण यशस्वी मुकाबला करू, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सुरक्षाविषयक आव्हानांचा एकत्रित मुकाबला; नवे संरक्षण दलप्रमुख जनरल अनिल चौहान यांचा निर्धार
नवे संरक्षण दलप्रमुख जनरल अनिल चौहान

पीटीआय, नवी दिल्ली : देशाचे दुसरे संरक्षण दलप्रमुख (सीडीएस) म्हणून जनरल अनिल चौहान यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. देशाच्या सुरक्षेला असलेली आव्हाने आणि अचडणींचा तिन्ही संरक्षण दलांच्या एकत्रित सामर्थ्यांच्या बळावर आपण यशस्वी मुकाबला करू, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती निधनानंतर नऊ महिने हे पद रिक्त होते. चौहान हे तीन तारांकित अधिकारी म्हणून निवृत्त झाले होते. त्यानंतर पुन्हा चार तारांकित अधिकारी म्हणून लष्करी सेवेत येणारे ते पहिलेच अधिकारी ठरले आहेत. सीडीएसबरोबरच ते संरक्षण मंत्रालयाचे मुख्य लष्करी सल्लागार म्हणूनही काम पाहतील. सीडीएस म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी जनरल चौहान यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर शहिदांना आदरांजली वाहिली. त्यानंतर रायसिना हिल्सवरील साऊथ ब्लॉकच्या हिरवळीवर त्यांना तिन्ही संरक्षण दलांकडून मानवंदना देण्यात आली. यावेळी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, वायू दलप्रमुख एअर चिफ मार्शल व्ही. आर. चौधरी आणि नौदल उपप्रमुख व्हाईस अ‍ॅडमिरल एस. एन. घोरमाडे उपस्थित होते.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या