धक्कादायक! सुरक्षारक्षकानेच न्यायाधीशाची पत्नी आणि मुलावर केला गोळीबार

सुरक्षेसाठी नियुक्त केलेल्या सुरक्षारक्षकानेच अतिरिक्त सत्र न्यायाधीशाची पत्नी आणि मुलावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

सुरक्षेसाठी नियुक्त केलेल्या सुरक्षारक्षकानेच अतिरिक्त सत्र न्यायाधीशाची पत्नी आणि मुलावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना गुरुग्राममध्ये घडली आहे. शनिवारी संध्याकाळी आई आणि मुलगा सेक्टर ४९ मध्ये औषधांच्या खरेदीसाठी गेलेले असताना सुरक्षारक्षकाने त्यांच्यावर गोळीबार केला.

दोघेही या गोळीबारात जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गाडीमधून त्यांनी बाहेर पाऊल टाकताच आरोपीने दोघांवर गोळीबार सुरु केला.

गुरुग्राम-फरीदाबाद रस्त्यावरुन पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. महीपाल (३२) असे आरोपीचे नाव असून मागच्या दोन वर्षांपासून तो या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी तैनात होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Security guard fire at judges wife son