पाकिस्तानचा विजय साजरा करणारे देशद्रोही ; उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे धोरण

फेसबुकवर पाकिस्तानी झेंडय़ाचे चित्र पोस्ट करून पाकिस्तानच्या समर्थनार्थ आक्षेपार्ह शेरे लिहिले होते

लखनऊ : नुकत्याच झालेल्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानने भारताविरुद्ध मिळवलेला विजय साजरा करणाऱ्यांविरुद्ध देशद्रोह कायदा लागू केला जाईल, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी सांगितले.

भारतीय क्रिकेट संघाबाबत कथितरीत्या असभ्य शब्द वापरल्याबद्दल आतापर्यंत पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

‘पाकिस्तानचा विजय साजरा करणाऱ्यांना देशद्रोहाच्या आरोपाला सामोरे जावे लागेल’, असे योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरील ट्वीटमध्ये म्हटले आहे.

बदाऊँ येथील एका इसमाला देशद्रोहाच्या गुन्ह्य़ासाठी बुधवारी अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक ओ. पी. सिंह यांनी दिली. नियाझ नावाच्या या इसमाने सामना संपल्यानंतर फेसबुकवर पाकिस्तानी झेंडय़ाचे चित्र पोस्ट करून पाकिस्तानच्या समर्थनार्थ आक्षेपार्ह शेरे लिहिले होते, असे हिंदू जागरण मंचाचे पुनित शाक्य यांनी त्याच्याविरुद्ध केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.नियाझ याने त्याच्या फेसबुक खात्यावर पाकिस्तानी झेंडय़ाचे चित्र टाकले होते आणि त्याखाली ‘आय लव्ह यू पाकिस्तान, आय मिस यू पाकिस्तान, जीत मुबारक पाकिस्तान’ अशी वाक्ये लिहिली होती, असे सिंह यांनी सांगितले. नियाझविरुद्ध देशद्रोहाच्या आरोपाखाली आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांखाली मंगळवारी गुन्हे दाखल करण्यात येऊन बुधवारी त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली, अशीही माहिती त्यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sedition charges against those celebrating pakistan victory yogi adityanath zws

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या