Digvijay Singh Car Accident : ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या गाडीचा मध्य प्रदेशमधील राजगड येथे अपघात झाला. त्यांच्या गाडीची एका दुचाकीस्वाराला धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला आहे. त्याच्या डोक्याला दुखापत झाली. अपघातानंतर दिग्विजय सिंह तातडीने कारमधून उतरले आणि त्यांनी अपघातग्रस्त व्यक्तीला जिरापूर येथील रुग्णालयात दाखल केले.

नेमकं काय घडलं?

रस्त्याने वाहनांची रहदारी सुरू होती. त्यावेळी एक दुचाकीस्वार अचानक उजवीकडील बाजुला वळाला. त्यामुळे उजवीकडून वेगाने येणाऱ्या दिग्विजय सिंह यांच्या गाडीची दुचाकीस्वाराला धडक बसली. या धडकेनंतर दुचाकीस्वार उडून बाजूला पडला. त्यानंतर दिग्विजय सिंह यांच्यासह गाडीचा चालक आणि इतर सहकारी तातडीने कारमधून बाहेर आले. त्यांनी दुचाकीस्वाराची पाहणी केली आणि त्याला रुग्णालयात दाखल केले.

Congress president Mallikarjun Kharge held a public meeting in Channapatna, Karnataka
नेते गेले तरी कार्यकर्ते काँग्रेसबरोबरच! ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या मुलाखतीत खरगे यांच्याकडून सत्ताबदलाचा विश्वास
Giriraj Singh interview issue of Kashi Mathura and Ayodhya Lok Sabha Election 2024
काशी, मथुरा व अयोध्येचा मुद्दा काँग्रेसकडून जाणीवपूर्वक प्रलंबित; गिरीराज सिंह यांचा आरोप
narendra modi rahul gandhi lalu yadav
“मुघलांच्या मानसिकतेतून…”, राहुल गांधी – लालू यादवांच्या ‘त्या’ व्हिडीओवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
Congress, Nana Patole car accident,
“विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपाला निवडणूक जिंकायची आहे का?”, नाना पटोलेंच्या अपघातावरून काँग्रेसचा सवाल

व्हिडीओ पाहा :

जखमी दुचाकीस्वारावल जिरापूर येथे प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी भोपाळला पाठवण्यात आलं आहे. दिग्विजय सिंह यांनी दुचाकीस्वाराच्या उपचाराचा संपूर्ण खर्च आपण करणार असल्याचं सांगितलं आहे.

हेही वाचा : मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरला? दिग्विजय सिंह यांच्या विधानानंतर चर्चेला उधाण!

दरम्यान, मध्य प्रदेश पोलिसांनी दिग्विजय सिंह यांची गाडी जप्त केली आहे. तसेच जखमीच्या तक्रारीवरून दिग्विजय सिंह यांची गाडी चालवणाऱ्या चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.