तालिबानला धक्का; अफगाणिस्तानात सत्तास्थापनेनंतर झाली वरीष्ठ नेत्याची हत्या, आयसिसने घेतली जबाबदारी!

अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या एका वरिष्ठ कमांडरची हत्या झाल्यानं खळबळ उडालीय. तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर पहिल्यांदाच तालिबानच्या इतक्या वरिष्ठ नेत्याचा मृत्यू झालाय.

अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या एका वरिष्ठ कमांडरची हत्या झाल्यानं खळबळ उडालीय. तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर पहिल्यांदाच तालिबानच्या इतक्या वरिष्ठ नेत्याचा मृत्यू झालाय. हमदुल्लाह मुखलीस असं या तालिबानी कमांडरचं नाव आहे. काबुलमधील रुग्णालयावर झालेल्या हल्ल्यात मुखलीसचा मृत्यू झाला. या हल्ल्याची जबाबदारी आयसिसने घेतली आहे.

हमदुल्लाह मुखलीस कट्टरतावादी संघटना हक्कानी नेटवर्कचा सदस्य होता. त्याची सध्या बादरी स्पेशल फोर्सेसमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितनुसार, तालिबानने काबुलवर ताबा मिळवल्यानंतर पहिल्यांदा तालिबानच्या एवढ्या वरिष्ठ नेत्याची हत्या झालीय.

नेमकं काय झालं?

मंगळवारी (२ नोव्हेबर) सरदार मोहम्मद दाऊद खान सैन्य रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर २ बॉम्बहल्ले करण्यात आले. त्यानंतर बेछूट गोळीबारही करण्यात आला. याला प्रत्युत्तर देताना तालिबानचा कमांडर हमदुल्लाह मुखलीस यांचा मृत्यू झाला.

आयसिसने हल्ल्याची जबाबदारी घेतली

राजधानी काबुलमध्ये केलेल्या गोळीबार आणि बॉम्ब हल्ल्याची जबाबदारी आयसिस या कट्टरतवादी संघटनेने घेतलीय. इस्लामिक स्टेटने (खोरसन) म्हटलं की इस्लामिक स्टेटच्या ५ लढाऊंनी हा हल्ला केला. दुसरीकडे तालिबानचा प्रवक्ता झबिउल्लाह मुजाहिदने आयसिसवर रुग्णालयातील नागरिक, डॉक्टर, रुग्णांवर हल्ला केल्याचा आरोप केलाय. तसेच या हल्ल्यानंतर तालिबानच्या लडाऊंनी केवळ १५ मिनिटातच प्रत्युत्तर दिल्याचा दावा मुजाहिदने केलाय.

हेही वाचा : अफगाणिस्तान आर्थिक संकटात; तालिबानी सरकारनं घेतला मोठा निर्णय; म्हणे, “इथून पुढे…!”

हल्ल्यानंतर तालिबानने अमेरिकेच्या सैन्य छावणीत मिळालेल्या हेलिकॉप्टरचा उपयोग करून तातडीने रुग्णालयाच्या ठिकाणी विशेष दलाला उतरवलं. त्याचवेळी एका आत्मघातकी बॉम्बरने रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ स्वतःला स्फोटकांनी उडवले. त्यानंतर इतरांनी रुग्णालयात गोळीबार केला, अशी माहिती तालिबानने दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Senior taliban commander hamdullah mokhlis killed in kabul afghanistan in isis attack pbs

Next Story
विराटच्या मुलीला धमकावणारा विकृत पाकिस्तानी नाही तर…; समोर आलं सत्य!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी