उत्तर प्रदेशात गॅस लीक झाल्याने सात कामगारांचा मृत्यू

सितापूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे

उत्तर प्रदेशात गॅस लीक झाल्याने सात कामगारांचा मृत्यू झाला आहे. सितापूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कार्पेट आणि अॅसिड फॅक्टरीमध्ये असणाऱ्या पाइपलाइनमधून ही गॅस गळती झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

शनिवारी नोएडामध्ये ४२ वर्षीय कामागराचा अमोनिया गॅस लीक झाल्याने हलदीराम इमारतीमधील एकाचा मृत्यू झाला होता. यावेळी ३०० जणांना तेथून सुरक्षास्थळी हटवण्यात आलं होतं. १२ वाजण्याच्या सुमारास गॅस लीक झाल्याची माहिती देण्यात आली होती. यानंतर पोलीस, अग्निशमन आणि एनडीआरफचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Seven killed after gas leak in uttar pradesh sgy

Next Story
बराक ओबामा यांची रोम्नींवर टीका
ताज्या बातम्या