सहकारी महिला पत्रकारावरील लैंगिक अत्याचारप्रकरणी सध्या तुरुंगात असलेला ‘तेहलका’चा संस्थापक संपादक तरुण तेजपाल याची न्यायालयीन कोठडी १० दिवसांनी वाढविण्यात आली आहे. प्रथमवर्गीय न्यायदंडाधिकारी क्षमा जोशी यांनी यासंबंधी निर्णय दिला.
याप्रकरणी तेजपालचा जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर त्याला गेल्या ३० नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. तेजपालने आता जामीन अर्ज नव्याने दाखल केला असून त्यावर उभय बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर त्यावर आता ७ जानेवारी रोजी सत्र न्यायालयाकडून निर्णय जाहीर करण्यात येईल.

वसईत पिता-पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत धक्कादायक कारण आलं समोर

“आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”

“एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास भाजपाचे प्लॅन…” आमदार अपात्रतेवर बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य

“…तर २०१८ मध्येच माझं लग्न झालं असतं”, तनुश्री दत्ताचा खुलासा; ‘या’ व्यक्तीचं नाव घेत म्हणाली, “लोकांचे आयुष्य बरबाद…”