भारतात टोकाची असहिष्णुता असल्याचे वक्तव्य बॉलीवूड बादशाहा शाहरुखने त्याच्या ५०व्या वाढदिवशी केले होते. त्यानंतर शाहरुखवर टीकाही करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर ‘जमात-उद्‌- दवा’ या अतिरेकी संघटनेचा प्रमुख हाफिज सईदने शाहरुखचे समर्थन केले आहे.
भारतात टोकाची असहिष्णुता – शाहरूख खान
जे कोणी मुस्लिम अगदी शाहरुखसुद्धा ज्यांना भारतात भेदभाव आणि अडचणींना सामोरे जावे लागतेय त्यांनी पाकिस्तानात यावे, या आशयाचे ट्विट हाफिज सईदने केले आहे. तसेच, पुढे त्याने असेही ट्विट केले की, शाहरुख खान सोबतच खेळ, अकादमी, साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्रातील नामवंत भारतीय मुस्लिमांना आपली ओळख निर्माण करण्यासाठी सतत झगडावे लागते.


भाजपचे महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी शाहरुख जरी भारतात राहत असला तरी त्याचा आत्मा पाकिस्तानात असल्याचे म्हटले होते. तसेच विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी शाहरुख खानवर पाकिस्तानचा एजंट असल्याची टीका केली होती.