Shanti Bhushan Passes Away : भारताचे माजी कायदा मंत्री आणि ज्येष्ठ वकील शांती भूषण(वय-९७) यांचे आज(मंगळवार) निधन झाले. मागील बऱ्याच दिवसांपासून ते आजारी होते. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांचे ते वडील होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शांती भूषण हे वकिली शिवाय राजकारणातही चर्चेतील नाव होतं. आजची पिढी भलेही त्यांना आम आदमी पार्टीचे संस्थापक सदस्य म्हणून ओळखत असेल, मात्र त्यांनी काँग्रेस(ओ) आणि जनता पार्टीच्या माध्यमातूनही राजकारणात स्वत:ला आजमावलं होतं. ते राज्यसभा खासदारही होते. सहा वर्षे ते भाजपामध्ये राहिले होते.

शांती भूषण आणि त्यांचे पुत्र प्रशांत भूषणही आम आदमी पार्टीचे संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. त्यांनी २०१२ मध्ये अरविंद केजरीवाल यांच्यासोबत आम आदमी पार्टीची स्थापना केली होती. मात्र कालांतराने हे दोघेही आम आदमी पार्टीपासून दूर झाले होते.

ही आपल्या सर्वांसाठी मोठी हानी –

आपल्या वडिलांच्या निधाननंतर इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना प्रशांत भूषण यांनी म्हटले की, मी केवळ एवढंच म्हणू शकतो की, “हा एका युगाचा अंत आहे. ते एक असे व्यक्ती होते ज्यांनी स्वातंत्र्य मिळाल्यापासून घटना आणि कायदे प्रणालीच्या विकासाला जवळून पाहिले. त्यांनी या अनुभवांबद्दल दोन पुस्तके – कोर्टिंग डेस्टिनी आणि माय सेकेंड इनिंग्स यामध्ये लिहिले आहे. मी केवळ एवढच बोलू शकतो की, ही आपल्या सर्वांसाठी मोठी हानी आहे.”

मोरारजी सरकारमध्ये होते कायदा मंत्री –

शांती भूषण हे मोरारजी देसाई सरकारमध्ये १९७७ ते १९७९ पर्यंत कायदा मंत्री होते. त्यांनी आपल्या आयुष्यात लोककल्यणाशी निगडीत अनेक मुद्दे उचलले होते. भ्रष्टाचाराविरोधात अण्णा हजारेंनी केलेल्या आंदोलनातही त्यांचा सहभाग होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shanti bhushan former law minister and senior advocate shanti bhushan passes away msr
First published on: 31-01-2023 at 22:12 IST