देशात उत्तर प्रदेशसह ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. या ५ पैकी ३ राज्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसही निवडणूक मैदानात उतरणार आहे. स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पवार म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस आगामी ५ पैकी ३ राज्यांच्या निवडणुकीत सहभागी होईल. मणिपूरमध्ये राष्ट्रवादीचे ४ आमदार होते. त्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून निवडणूक लढण्याबाबत चर्चा झालीय. मणिपूरमध्ये आम्ही एकूण ५ ठिकाणी निवडणूक लढू.”

“गोव्यात राष्ट्रवादीची काँग्रेस, टीएमसीसोबत चर्चा सुरू”

“गोव्यात काँग्रेस, टीएमसी, राष्ट्रवादीची चर्चा सुरू आहे. गोव्यात काही ठिकाणी आम्हाला निवडणूक लढवायची होती त्याची यादी आम्ही इतर दोन्ही पक्षांना दिलीय. पुढील २ दिवसात त्यावर अंतिम निर्णय होईल,” असं शरद पवार यांनी सांगितलं.

“उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रवादी, समाजवादी पक्षाची युती”

शरद पवार म्हणाले, “उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रवादी, समाजवादी पक्ष आणि इतर छोट्या पक्षांची युती झालीय. या सर्वांची एक मोठी बैठक होईल. तिथं काही जागा लढवण्यावर आमची चर्चा झाली आहे. उद्या लखनौमध्ये जागांची वाटप घोषित होईल.”

हेही वाचा : “शरद पवार यांनी जनतेचा विचार करून रयत संस्थेचे अध्यक्षपद सोडावे”, शिवसेनेच्या ‘या’ आमदाराची मागणी

“पुढील आठवड्यात आम्ही सर्व उत्तर प्रदेशमधील प्रचारात सहभागी होऊ. उत्तर प्रदेशमधील परिस्थिती खूप बदलली आहे,” असंही पवारांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar announce list of 3 states in which ncp going to contest assembly election pbs
First published on: 11-01-2022 at 16:15 IST