राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार यांना करोनाची लागण (Sharad Pawar Tested Corona Positive) झाली आहे. ८१ वर्षीय पवार यांनी ट्वीट स्वत:च करोना संसर्ग झाल्याची माहिती दिलीय. आपल्या संपर्कात आलेल्यांनी खबरदारी घ्यावी आणि चाचणी करुन घ्यावी असं आवाहन त्यांनी केलंय. पवारांनी केलेल्या ट्विटनंतर अनेक बड्या नेत्यांनी त्यांना करोनावर मात करुन लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्यात. यामध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींबरोबरच काँग्रेसचे महाराष्ट्रामधील प्रमुख नेते बाळासाहेब थोरात यांच्याबरोबरच इतरही नेत्यांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पवार काय म्हणाले…”माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पण काळजीचं काही कारण नाही. मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. मी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती करतो की त्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी आणि खबरदारी घ्यावी,” असं पवार यांनी २४ जानेवारी २०२२ रोजी दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पवारांच्या ट्विटवर रिप्लाय करुन. “तुम्ही यामधून लवकर बरे व्हावं यासाठी मी प्रार्थना करतो, शरद पवारजी,” असा रिप्लाय नितीन गडकरींनी केलाय. तर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी, “तुम्हाला लवकर बरं वाटावं आणि यामधून तुम्ही पूर्णपणे बरं व्हावं यासाठी शुभेच्छा. काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा,” असं बाळासाहेब थोरात म्हणालेत. तर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी, “शरद पवारजी काळजी घ्या. तुम्हाला लवकर बरं वाटावं अशी इच्छा व्यक्त करते,” असं वर्षा पवार म्हणाल्यात.

काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, ‘गेट वेल सून शरद पवार सर,’ असा रिप्लाय केलाय. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ “आदरणीय पवार साहेब व आपल्या कुटुंबातील अन्य सदस्य आपल्या आरोग्याची काळजी घ्या आपण कोरोनावर मात करून लवकरात लवकर बरे व्हाल हा विश्वास आहे. आमच्या सदिच्छा आपल्या सोबत आहेत,” असं म्हटलंय.

शरद पवार यांनी करोनाची पहिली लस १ फेब्रुवारी २०२१ रोजी घेतली होती त्यानंतर ७ मार्च २०२१ रोजी त्यांनी करोना प्रातिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar corona positive from gadkari to patole leaders wish him speedy recovery scsg
First published on: 24-01-2022 at 15:19 IST