देशाच्या संसदेपासून राज्यातील विधानसभेमध्ये आणि वृत्तवाहिन्यांवरील चर्चा सत्रांपासून ते सोशल मीडियापर्यंत चर्चेत असणारा विषय म्हणजे ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट. १९९० मध्ये काश्मिरमधून कश्मिरी पंडितांनी केलेल्या पलायनाच्या कथानकावर आधारित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडले असले तरी या चित्रपटावरुन मागील काही दिवसांपासून राजकीय वादही सुरु आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ३२ वर्षानंतर दाबून ठेवण्यात आलेलं हे प्रकरण उत्तमरित्या समोर मांडण्यात आल्याचा दावा करणार एक मतप्रवाह आहे तर दुसरीकडे या चित्रपटाच्या माध्यमातून समाजामध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय असा दावा करणार गट आहे. अनेक भाजपाशासित राज्यांमध्ये करमुक्त झालेल्या या चित्रपटाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागील मंगळवारी एका भाषणादरम्यान तौंडभरुन कौतुक केलं. असं असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या चित्रपटाबद्दल पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीय.

नक्की पाहा >> Photos: ‘द कश्मीर फाइल्स’चे समर्थक-विरोधक रितेशवर संतापले; कोणी ‘नेत्याचा मुलगा’ म्हटलं तर कोणी ‘झुंड’वरुन सुनावलं

रविवारी सायंकाळी बारामतीमध्ये प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना शरद पवारांना या चित्रपटासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ‘द कश्मीर फाइल्स’च्या मुद्द्यावरुन शरद पवारांनी केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सत्तेत असणाऱ्या भाजपा सरकारवर निशाणा साधला. “देश सध्या एका विचाराने चालला असून समाजातील सर्व घटक एकत्र आहेत. असं असताना समाजामध्ये पुन्हा दुरावा निर्माण होईल अशा प्रकारचे लिखाण करणे किंवा चित्रपटाची निर्मातिी करणे टाळायला हवं. या चित्रपटात कळत-नकळत काँग्रेसला दोष देण्याचा प्रयत्न केला जातोय,” असं पवार यांनी आपलं मत मांडताना म्हटलं.

devendra fadanvis
उपमुख्यमंत्री फडणवीस यांना समाज माध्यमांवर ठार मारण्याची धमकी; चित्रफीत शेअर करणाऱ्याला अटक
Jayant Patil on Ajit Pawar comparision to Modi- Shah
‘तुलना कुणाशी करायची, याचं भान…’, अजित पवारांच्या ‘त्या’ दाव्यानंतर जयंत पाटील यांचा टोला
dwarka pm modi
प्राचीन द्वारका नगरीच्या दर्शनातून पंतप्रधान मोदींचा अहिर समुदायाला संदेश
Kangana Ranaut
चित्रपटसृष्टीने आपल्याला अनेकदा अपमानित केले, कंगना राणावतचा न्यायालयात दावा

नक्की वाचा >> “मी ‘गुजरात फाइल्स’ बनवायला तयार, सत्य मांडणार पण तुम्ही आश्वासन द्या की…”; दिग्दर्शकाची मोदींकडे मागणी

पुढे बोलताना पवार यांनी, “आपण सर्व बाबींचा सखोल विचार करण्याची गरज आहे. काश्मिरमध्ये जे काही घडलं आणि जे सध्या दाखवलं जातंय (त्यात फरक आहे), त्यावेळी देशाचं नेतृत्व काँग्रेसकडे नव्हतं. त्या कालखंडमध्ये नेतृत्व विश्वनाथ प्रताप सिंह यांच्याकडे होतं. आज यासंदर्भात आवाज उठवणारे भाजपाचे लोक व्ही. पी. सिंहांच्या सरकारमध्ये होते. भाजपाच्या पाठबळामुळेच या कालावधीत मुफ्ती मोहमम्मद सईद हे देशाचे गृहमंत्री झाले होते. तेव्हा जम्मू-काश्मिरमध्ये राज्यपाल राजवट होती. फारुख अब्दुल्ला सत्तेपासून दूर झाले होते. तेथील राज्यपालही काँग्रेसच्या विचारांचे नव्हते,” असं नमूद केलंय.

नक्की वाचा >> ‘२०२४ चा इलेक्शन स्टंट’, ‘मुस्लिमांनाही मारलं’, ‘BJP नेही आमच्यासाठी…’; The Kashmir Files बद्दल काश्मिरी पंडितांची मतं

उद्धव ठाकरेंनाही केली टीका…
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारवर टीका केलीय. “काश्मिरमध्ये केवळ काश्मिरी पंडितांवरच अत्याचार झाले नाहीत. तर काश्मिरी पंडितांपूर्वी आपल्या देशाच्या बाजूने असणाऱ्या मुस्लिमांवर अत्याचार झाले होते. तेव्हा जगमोहन काश्मीरचे राज्यपाल होते. त्यावेळी त्यांनी काश्मिरी पंडितांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी काश्मीर सोडून निघून जावं, असं म्हटलं होतं. मात्र जेव्हा हे सगळं घडत होतं, तेव्हा केंद्रात भाजपाचं समर्थन असमारं व्ही. पी. सिंह यांचं सरकार होतं. आम्ही व्ही. पी. सिंह यांना विरोध केला होता. कारण सिंह हे पंतप्रधान झाल्यानंतर कोणत्याही मंदिरात गेले नव्हते तर दिल्लीच्या जामा मशिदीत जाऊन शाही इमामला भेटून आले होते. भाजपाने त्यावेळी व्ही. पी. सिंह यांच्याबद्दल एक अवाक्षरही काढलं नव्हतं, कारण त्यांचा त्यांना पाठिंबा होता,” असं उद्धव यांनी म्हटलंय.

नक्की वाचा >> The Kashmir Files वरुन संतापल्या मेहबूबा मुफ्ती; मोदी सरकारवर टीका करत म्हणाल्या, “ज्या पद्धतीने…”

“बाळासाहेब ठाकरे यांनी आवाज उठवला…”
“काश्मिरच्या खोऱ्यात तेव्हा काश्मिरी पंडितांवर अत्याचार सुरू होते, मात्र भाजपाने त्याबद्दल एक अवाक्षर काढलं नव्हतं. तेव्हा त्यांच्यासाठी फक्त हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आवाज उठवला होता. बाकी कोणताही मायेचा पूत जो आज त्या काश्मिरी पंडितांबाबत कितीही अश्रू ढाळत असला तरी त्याने त्यावेळी एक शब्दही बोलण्याची हिंमत केली नव्हती आणि हेच सत्य आहे,” असं उद्धव ठाकरे यांनी रविवारी शिवसंपर्क अभियानाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे खासदार व संपर्कप्रमुखांशी ऑनलाइन संवाद साधताना म्हटलं.

नक्की वाचा >> “केंद्र सरकारने ‘द कश्मीर फाइल्स’वर बंदी घालावी, या चित्रपटामुळे…”; खासदाराने केली मागणी

मोदी काय म्हणाले होते?
‘सातत्याने व्यक्तिस्वातंत्र्याचा झेंडा घेऊन उभी असलेली टोळी या चित्रपटाची बदनामी करत आहे’, असा आरोप मोदींनी मंगळवारी या चित्रपटाबद्दल बोलताना केला.

काश्मीर खोऱ्यामधून १९९० मध्ये काश्मिरी पंडितांच्या पलायनावर या चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे. काश्मिरी पंडितांच्या विस्थापनाचा मुद्दा भाजपाच्या अजेंड्यावरही राहिलेला आहे. या चित्रपटावर काँग्रेसने तसेच, काही सिनेमा परीक्षकांनी प्रतिकुल मते व्यक्त केली आहेत. या विरोधाचा संदर्भ देत, मोदींनी मंगळवारी भाजपाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत या चित्रपटाचे समर्थन केले.

नक्की वाचा >> The Kashmir Files च्या मुद्द्यावरुन नितेश राणेंना शिवसेनेच्या विनायक राऊतांचा पाठिंबा; म्हणाले, “हा चित्रपट…”

‘हा चित्रपट काश्मिरी पंडितांबाबत कित्येक वर्षे जाणीपूर्वक दडवून ठेवलेले सत्य मांडतो. मात्र, या चित्रपटाची बदनामी केली जात आहे. एखाद्याला हा चित्रपट आवडला नसेल तर त्याला प्रत्युत्तर देणारा वा प्रतिवाद करणारा चित्रपट निर्माण करावा’, असे मत मोदी यांनी भाजपाच्या खासदारांसमोर मांडले.

नक्की वाचा >> ‘द कश्मीर फाइल’ पाहण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना ‘या’ दोन अटींवर मिळणार ‘हाफ डे’; मुख्यमंत्र्यांची घोषणा

कुठलाही सिनेमा चांगला की, वाईट याची नीट समीक्षा केली पाहिजे पण, त्याऐवजी या चित्रपटाविषयी शंका-कुशंका घेतल्या जात असून हे कट-कारस्थान आहे. कुठल्याही विषयावर योग्य मार्गाने सत्याची मांडणी झाली पाहिजे. त्यामुळे चिंता फक्त या चित्रपटाबद्दल नाही. देशाच्या भल्यासाठी सत्य मांडले पाहिजे. संबधित विषयातील एक बाजू एखाद्याला महत्त्वाची वाटू शकते, दुसऱ्याला अन्य एखादी बाजू महत्त्वाची वाटेल. हा चित्रपटातून सत्य मांडले जात असेल तर त्याला विरोध कशासाठी केला जात आहे, असा सवाल मोदींनी केला.

नक्की वाचा >> The Kashmir Files संदर्भातील ‘त्या’ पोस्टमुळे स्वरा भास्करवर अनेकजण संतापले; म्हणाले, “तुझ्या सॉफ्ट पॉर्न सिरीजला…”

पाकिस्तानकडून काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांना आर्थिक व लष्करी मदत पुरवली गेली. दहशतवाद्यांनी अनेक काश्मिरी पंडितांची हत्या केली. या हत्यासत्रानंतर काश्मिरी पंडितांना खोऱ्यातून पलायन करावे लागले होते. विस्थापित झालेले काश्मिरी पंडित अजूनही खोऱ्यात परत येऊ शकलेले नाहीत. हे सत्य ज्यांना दडपून टाकायचे आहे, तेच या चित्रपटाला विरोध करत आहेत, असे मोदी म्हणाले.