मागील एक महिन्यापासून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात देशभरात आंदोलन सुरू आहे. विरोधकांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) आणि निवडणुकीतील कथित गैरप्रकारांविरोधात विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीच्यावतीने आज १ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. दरम्यान माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी ज्ञानेश कुमारांचा मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकारला सुनावलं आहे.
काय म्हणाले शरद पवार?
“ज्ञानेश कुमार यांच्या संदर्भात केंद्र सरकारने तातडीने निर्णय घेण्याची गरज होती. त्याच्यामुळे आज आणि उद्या सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. आमच्या पक्षाच्या वतीने सुप्रिया सुळे आणि स्थानिक नेते या आंदोलनात सहभागी झाले आहेत, अशी माहिती शरद पवार यांनी दिली. मी जबाबदार माणूस आहे. जबाबदारीने भाष्य़ करत आहे, असे ते म्हणाले.
भाजपाच्या यात्रेवर मी राजकीय दृष्ट्या बोलणार नाही-पवार
ठाणे येथील भाजपाच्या यात्रेवरही शरद पवारांनी भाष्य केलं. “मी त्यावर राजकीय दृष्ट्या बोलणार नाही. राजकारण आणू नये सर्वांनी मदत करावी ही आराजकता नाही. कोणी राजकारण आणू नये. संकटावर मात करावी लागेल. पाच हजार मदतीविषयी माझी दिल्ली आणि मुख्यमंत्र्यांशी बैठक झाली आहे, काहीतरी मार्ग काढला जाईल अशी खात्री आहे” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दुष्काळासंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
दुष्काळसंदर्भात मी माहिती घेत आहे. आज मी पंढरपूर तालुक्यातील दुधाळी गावात जाणार आहे. उद्या सोलापूर येथे जाणार आहे. त्यानंतर भूम-परंडा आणि धाराशिव इथं जाणार आहे. माझ्या सोबत स्थानिक आमदार आहेत. मी काही प्राथमिक माहिती मागवली, त्यात पाणी, चारा आणि हाताला काम देणे अत्यंत आवश्यक आहे, असे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले. यावेळी त्यांनी या जिल्ह्यातील टँकर आणि पाण्याच्या स्थितीची माहितीही दिली. त्यांनी या जिल्ह्यातील दुष्काळाचे भीषण वास्तव समोर आणले.
केंद्र सरकारकडून भरीव मदतीची अपेक्षा आहे
सोलापूरमध्ये १३९ गावं बाधीत आहेत. इथं १३५ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. ४० विहीर आहेत. २१ इंधन विहिरी आहेत. माढामध्ये ११० टँकर आहे. एका जिल्ह्यात, एका तालुक्यात असे प्रमाण आहे. शेजारच्या जिल्ह्यात अशीच परिस्थिती आहे. या दुष्काळग्रस्त पट्ट्यात मदतीची गरज आहे. धीर देण्याची गरज आहे. मला खात्री आहे की राज्य सरकारने जर केंद्र सरकारला हे पटवून दिलं तर भरीव मदत मिळेल. पाण्याच दिवसेंदिवस डिमांड वाढत असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. खडकवासला आणि इतर धरणातील पाणी काळजीपूर्वक वापरले पाहिजे. आज पासून ते जवळपास जून पर्यंत काळजी घ्यावी लागणार आहे. पाण्याचा साठा यावर लक्ष दिलं पाहिजे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
