रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा केली आहे. युक्रेन आणि रशियामधील युद्ध टाळलं जाऊ शकत नाही असं पुतिन म्हणाले आहेत. या घोषणेनंतर जगभरातील आर्थिक व्यवस्थेवर परिणाम दिसून येत आहे. भारतीय शेअर बाजारातही मोठी घसरण झाली आहे. गुरुवारी बाजार उघडताच हजार अंकानी घसरला. निफ्टीतही मोठी घसरण नोंदवण्यात आली. युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाच्या सर्व एक्सचेंजवर ट्रेडिंग बंद करण्यात आलं आहे.

रशिया आणि युक्रेनमधील वाढता तणाव आणि युक्रेनची राजधानी आणि इतर भागात बॉम्बस्फोट झाल्याच्या बातम्यांचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. भारतीय शेअर बाजार सलग सातव्या व्यवहारी दिवशी घसरणीसह बंद झाला. केवळ आजच्या घसरणीत शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे १३.३२ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.आठवड्याच्या चौथ्या दिवशी भारतीय बाजारांची सुरुवात लाल चिन्हाने झाली. सेन्सेक्समध्ये १४२६.२८ अंकांची म्हणजेच २.४९ टक्क्यांची घसरण झाली आणि निर्देशांक ५५८०५.७८ च्या पातळीवर उघडला. शेअर बाजार बंद झाला तेव्हा २७०२.१५ अंकांनी सेनेक्समध्ये घसरण झाली होती. ४.२७ टक्क्यांच्या घसरणीसह सेन्सेक्स ५४,५२९.९१ अंकावर स्थिरावला. तर निफ्टीतही ८१५.३० अंकांनी आपटला. ४.७८ टक्के घसरणीसह निफ्टी १६,२४७.९५ गुणांवर स्थिरावला. निफ्टीच्या टॉप घसरण झालेल्या कंपन्यांच्या यादीत यूपीएल, टाटा मोटर्स, इंडलइंड बँक, टाटा स्टील आणि आयसीआयसीआय बँकेचा समावेश आहे. बुधवारी, डाऊ जोन्स ४६४ अंकांनी घसरून ३३१३१ वर बंद झाला होता. त्याच वेळी नॅस्डॅक्स २.५७ टक्के म्हणजेच ३४४ अंकांनी घसरला. या घसरणीमुळे नॅस्डॅक्स १३०३७ या पातळीवर बंद झाला. एवढेच नाही तर एसअँडपीमध्येही देखील ७९ अंकांची घसरण नोंदवली गेली. दुसरीकडे MCX वर सोन्याच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर १० ग्रॅम सोन्याचा भाव ११७५ रुपयांनी वाढून ५१५५४ रुपयांवर पोहोचला आहे. त्याचबरोबर चांदीचा दर ६५८२४ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

Share Market
Stock Market Opening Bell : मतदानाच्या पहिल्या टप्प्यात शेअर बाजारात पडझड, सेन्सेक्स-निफ्टीची नकारात्मक सुरुवात
through online transactions, airline employee, defrauded, shil pahata area, thane
ठाणे : विमान कंपनीतील कर्मचाऱ्याची ३७ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
nashik, malegaon, clerk arrested, ration office, Accepting Bribe, Register Needy Families, Welfare Schemes, malegaon bribe case,
नाशिक : लाच स्वीकारताना कारकुनास अटक
The crime branch police demanded a bribe of 10 lakhs crime news
गुन्हे शाखेच्या पोलिसाने मागितली १० लाखांची लाच; काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रशिया युक्रेन युद्ध

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी विशेष लष्करी ऑपरेशनला सुरुवात करत असल्याचं सांगितलं असून या लष्करी कारवाईमधून युक्रेनचे असैनिकीकरण करण्याचा प्रयत्न असेल असंही ते म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी युक्रेनच्या लष्कराला शस्त्र खाली ठेवा आणि आपल्या घऱी निघून जा असंही सांगितलं आहे. इतकंच नाही तर अमेरिकेसह इतर युरोपला मधे पडल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे. दुसरीकडे युक्रेनने संयुक्त राष्ट्राकडे युद्ध थांबवण्यासाठी विनंती केली आहे. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी युद्धाची घोषणा केली असताना हे युद्ध थांबवणं संयुक्ता राष्ट्राची जबाबदारी असल्याचं युक्रेनने म्हटलं आहे.