जागतिक बाजारात आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजाराची सुरूवात मोठ्या घसरणीने झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीतही मोठी घसरण झाली आहे. बाजाराच्या सुरूवातीच्या तासाभरातच सेन्सेक्स ४०० अंकांनी घसरला असून ५९२०० त्या आसपास पोहोचला. तर निफ्टीने १७,७०० चा आकडा गाठला.
यात रिलायन्स इंडस्ट्रीज ३.२% टक्क्यांनी घसरलं असून त्याखालोखाल बजाज फायनान्स, कोटक बँक आणि मारुती सुझुकी इंडिया हे आहेत. तर भारती एअरटेलच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांची वाढ होत सर्वोत्तम स्थानावर आहेत, तर त्यापाठोपाठ एशियन पेंट्स, प़ॉवर ग्रीड आणि इंडसइंड बँक आहेत.

“गेल्या आठवडाभरात बाजारांनी काही सुधारणा केल्या आहेत आणि दर्जेदार शेअर्सच्या खरेदीसाठी चांगली संधी आहे, अशी माहिती हेम सिक्युरिटीजचे प्रमुख मोहित निगम यांनी दिली.

या आठवड्यात टेरिफ वाढवण्याच्या टेल्कोच्या निर्णयावर गुंतवणूकदारांनी प्रतिक्रिया दिल्याने भारती एअरटेलच्या शेअरची किंमत सोमवारी ३.९% वाढून ७२४ रुपये प्रति शेअर झाली. भारती एअरटेलने मोबाईल प्रीपेड टॅरिफ २० ते २५ टक्क्याने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.