जामिया मिलिया विद्यापीठ हिंसाचार प्रकरण : शर्जिल इमाम निर्दोष, दिल्ली न्यायालयाचा निर्वाळा | sharjeel imam acquitted by delhi court in case of delhi jamia millia islamia university violence | Loksatta

जामिया मिलिया हिंसाचार प्रकरण : शर्जिल इमाम निर्दोष, दिल्ली न्यायालयाचा निर्वाळा

दिल्ली न्यायालयाने शर्जिल इमाम तसेच आसिफ इक्बाल तन्हा यांना दोषमुक्त केले आहे.

sharjeel imam
शर्जिल इमाम (संग्रहित फोटो)

दिल्ली न्यायालयाने शर्जिल इमाम तसेच आसिफ इक्बाल तन्हा यांची निर्दोष मुक्तता केली आहे. २०१९ साली दिल्लीमधील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराप्रकरणी त्यांच्यावर वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल

शर्जिल इमाम तसेच आसिफ इक्बाल तन्हा यांच्यावर दंगा तसेच हिंसेला प्रोत्साहित केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यांच्यावर १४३, १४७, १४८, १४९, १८६, ३५३, ३३२, ३३३, ३०८, ४२७, ४३५, ३२३, ४३१, १२० ब तसेच भारतीय दंडविधानाच्या कलम ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा >>> महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद ताजा असताना कर्नाटक सरकारची मोठी घोषणा, १०० कोटी निधी देत मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले…

शर्जिल इमामवर आरोप काय होते?

शर्जिल इमाम तसेच आसिफ इक्बाल तन्हा यांच्यावर प्रक्षोभक भाषण करून लोकांना हिंसाचारासाठी भडकावल्याचा आरोप होता. २०१९ साली नागरिकत्व कायद्याला देशभरातून विरोध करण्यात आला होता. याच काळात शर्जिल इमामने जामिया मिलिया विद्यापीठ परिसरात प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप करण्यात आला होता. या भाषणानंतर येते हिंसाचार भडकल्याचाही आरोप केला होता. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी शर्जिलला जहानाबाद येथून अटक केले होते.

हेही वाचा >>>‘…तर कदाचित सुंता झाली असती,’ अजित पवारांवर टीका करणाऱ्या पडळकरांना जितेंद्र आव्हाडांचे उत्तर, म्हणाले “संभाजी महाराज…”  

दरम्यान शर्जिल इमालला दिल्ली न्यायालयाने दोषमुक्त केले असले तरी २०२० साली झालेल्या दिल्ली दंगलीप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल असल्यामुळे त्याला कोठडीतच राहावे लागणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 12:05 IST
Next Story
Rahul Gandhi letter to PM Modi : “…ही काश्मिरी पंडितांसोबतची क्रूरता”, राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल