scorecardresearch

शशी थरूर यांना थेट राष्ट्रवादीकडून ऑफर, म्हणाले “पक्षात येण्याची… “

काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खरगे यांना आव्हान देणारे काँग्रेसचे खासदार शशी थरूर सध्या नाराज असल्याचे म्हटले जात आहे.

शशी थरूर यांना थेट राष्ट्रवादीकडून ऑफर, म्हणाले “पक्षात येण्याची… “
शरद पवार आणि शशी थरूर (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खरगे यांना आव्हान देणारे काँग्रेसचे खासदार शशी थरूर सध्या नाराज असल्याचे म्हटले जात आहे. त्यांच्याकडे पक्षाकडून दुर्लक्ष केला जात असल्याचा दावा केला जात आहे. असे असतानाच थरूर यांना पक्षांतर्गत विरोधालाही सामारे जावे लागत आहे. थरूर यांना समर्थन देण्याच्या मुद्द्यावरून केरळमधील काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. असे असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने थरूर यांना एक खुली ऑफर दिली आहे. राष्ट्रवादीमध्ये यावे, तुमची तिरुअनंतपुरमची खासदारकी कायम राहील, असे केरळ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पीसी चाको म्हणाले आहेत. चाको यांच्या या ऑफरनंतर थरूर यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा >>> शिवरायांच्या एकेरी उल्लेखाचा व्हिडीओ आल्यानंतर रावसाहेब दानवेंनी मागितली माफी, म्हणाले “तो व्हिडीओ…”

पीसी चाको यांनी काय ऑफर दिली?

केरळ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पीसी चाको यांनी शशी थरुर यांना राष्ट्रवादी पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. ‘शशी थरूर यांची राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याची इच्छा असेल तर आम्ही त्यांचे आनंदाने स्वागत करू. काँग्रेस पक्षाने नाकारल्यानंतरही त्यांची तिरुअनंतपुरूम येथून खासदारकी कायम राहील. काँग्रेस त्यांच्याकडे दुर्लक्ष का करत आहे, हे मला समजत नाहीये,’ असे पीसी चाको म्हणाले.

हेही वाचा >>> लालूप्रसाद यादव यांच्यावर आज सिंगापूरमध्ये शस्त्रक्रिया, मुलगी देणार किडनी; शेअर केला रुग्णालयातील फोटो

चाको यांच्या या ऑफरनंतर खुद्द शशी थरूर यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘मला राष्ट्रवादीत जायचे असल्यास स्वागताची गरज भासेल. मात्र मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार नाही. पक्षप्रवेशाबाबत पीसी चाको यांच्याशी कोणताही चर्चा झालेली नाही,’ असे शशी थरुर म्हणाले आहेत.

दरम्यान, केरळ काँग्रेसमधील एक गट शशी थरूर यांच्यावर नाराज आहे. काँग्रेस पक्षातीलच थरूर यांच्या विरोधकांच्या मते केरळमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी थरूर मुख्यमंत्रीपदाची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या प्रतिमासंवर्धनाचे काम सुरू केले आहे. २०२६ साली येथे विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. तर मला घाबरण्याचे कारण नाही. मला केरळ काँग्रेसमध्ये कोणतेही गट पाडायचे नाहीत. माझी तशी इच्छा नाही, असे स्पष्टीकरण थरूर यांनी दिलेले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 14:00 IST

संबंधित बातम्या