Shashi Tharoor Slams Nitesh Rane over statemen against Muslims : भाजपा नेते व मंत्री नितेश राणे हे नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. शुक्रवारी (१० जानेवारी) सांगलीमध्ये बोलत असताना पुन्हा एकदा त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. राणे म्हणाले, “हिंदू म्हणून आपली भूमिका स्पष्ट ठेवली आणि हिंदूंनी एकत्र येऊन आम्हाला मतदान केलं, म्हणून आम्ही जिंकलो. त्यामुळे आता हे (महाविकास आघाडी) लोक ईव्हीएमच्या (EVM) नावाने बोंबलत आहेत. ते लोक ईव्हीएमच्या नावाने बोंबलतायत कारण त्यांना हिंदू एकत्र आल्याचं हजम (पचन) होत नाहीये. खरंतर यांना ईव्हीएमचा अर्थच माहिती नाही. ईव्हीएम म्हणजे Every Vote Against Mullah (प्रत्येक मत हे मुल्लाहविरोधात). आम्ही या ईव्हीएममुळेच निवडून आलेलो आहोत. राणे यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर विरोधकांकडून, अल्पसंख्याक समुदायाच्या नेत्यांकडून टीका होत आहे.

दरम्यान, काँग्रेसचे नेते व खासदार शशी थरूर यांनी नितेश राणे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. एएनआय या वृत्तसंस्थेशी बातचीत करत असताना थरूर म्हणाले, “आपल्या देशात अशा प्रकारची वक्तव्ये नेत्यांकडून ऐकायला मिळत आहेत हे खूप धक्कादायक आहे. या लोकांनी स्वातंत्र्यलढा समजून घेतला पाहिजे. आपलं मूळ उद्दीष्ट समजून घेतलं आहे”. तर आरपीआयचे (आठवले गट) अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, “नितेश राणे यांचं हे वक्तव्य अत्यंत चुकीचं आहे. त्यांनी असं बोलायला नको होतं”. राष्ट्रीय जनता दलाचे नेते मनोज झा म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या लोकांवर थोडं नियंत्रण ठेवायला पाहिजे”.

Ashish Shelar On Saif Ali Khan Attack
Ashish Shelar : “अतिशय भितीदायक घटना, आरोपीच्या शोधासाठी…”, सैफ अली खानवरील हल्ल्याच्या घटनेबाबत आशिष शेलारांची महत्वाची माहिती
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Saif Ali Khan Sister Saba Ali Khan Pataudi emotional post
“भाईजान आम्हाला तुझा…”, सैफ अली खानसाठी बहिणीची भावुक पोस्ट, बालपणीचा फोटो शेअर करत म्हणाली…
Saif Ali Khan
“धक्का बसला…”, सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यावर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून पहिली प्रतिक्रिया; दाक्षिणात्य सुपरस्टार म्हणाला…
What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : संजय राऊत यांची टीका, “सैफ अली खानवर हल्ला होणं ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी…”
kaeena kapoor khan reaction on saif ali khan attack
“कुटुंबातील इतर सदस्य…”, पती सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबद्दल करीना कपूरची पहिली प्रतिक्रिया
police reaction on saif ali khan attack
“त्याच्या गृहसेविकेबरोबर वाद…”, सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांची पहिली प्रतिक्रिया
Sanjay Raut Answer to Amit Shah
Sanjay Raut : संजय राऊत यांचं अमित शाह यांना उत्तर, “उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आणि…”

हे ही वाचा >> एकनाथ शिंदे की अजित पवार, अधिक विश्वासू सहकारी कोण? देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक उत्तर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (शरद पवार) संताप

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले, “मुळात राज्य किंवा केंद्रातले मंत्री संविधानाची शपथ घेऊन मंत्री बनतात. आपल्या संविधानानुसार सर्वजण समान आहेत. या संविधानाची शपथ घेणाऱ्यांनी सर्वांना समानतेच्या दृष्टीने पाहायचं असतं. मात्र त्यांनीच अशा प्रकारची भाषा करणं मंत्र्यांना शोभत नाही”.

हे ही वाचा >> Ajit Pawar On Loan Waiver : अजित पवारांचं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल मोठं विधान; म्हणाले, “माझ्या भाषणात कधी तुम्ही…”

नितेश राणे काय म्हणाले होते?

नितेश राणे म्हणाले होते, “मी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकून इथे आलो आहे. मी कधी दुसरीकडे गेलो नाही. मला हिंदूंनीच मतदान केलं. त्यांच्यामुळे मी आमदार म्हणून निवडून आलो आणि मंत्री झालो आहे”. राणे यांनी यापूर्वी देखील अनेकवेळा मुस्लीमविरोधी वक्तव्ये केली आहेत. त्यांनी सातत्याने मुस्लीम समुदायावर टीका केल्यामुळे त्यांच्यावर देशभरातून टीका होत आहे.

Story img Loader