गेल्या काही वर्षांत लिंगबदल केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. बदललेल्या लिंगानुसार कायदेशीर दस्तावेजही तयार करून स्वतःची अधिकृत नवी ओळख तयार केली जाते. आता असाच प्रकार भारतीय नागरी सेवेतही झाला आहे. एका महिला अधिकाऱ्याने आपलं लिंग आणि नाव बदललं असून या बदलास अर्थ मंत्रालयाने परवानही दिली आहे. हा अधिकारी भारतीय महसूल विभागातील आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

वरिष्ठ भारतीय महसूल सेवा अधिकाऱ्यारी असलेल्या एम. अनुसूया (३५) यांनी आपल्या नावात आणि लिंगात बदल केला आहे. या बदलासाठी त्यांनी विनंती केली होती. त्यांच्या विनंतीला परवानगी देण्यात आली. भारतीय नागरी सेवेत असं पहिल्यांदाच घडलं आहे.

IAS officer wife rape case
सेवानिवृत्त IAS अधिकाऱ्याच्या पत्नीचा सावत्र मुलगा व जावयावर बलात्काराचा आरोप; म्हणाली, “मला बांधून…”
Mark Rutte bicycle video
ना जाहिरातबाजी, ना सोहळा… ‘या’ देशाचे पंतप्रधान राजीनामा देऊन सायकलवर बसून घरी गेले, VIDEO व्हायरल
Mumbai BMW Hit and run case latest update
Worli Hit And Run Case : मिहीर शाहच्या मित्राची ‘ती’ एक चूक अन् पोलिसांनी आवळल्या साऱ्यांच्याच मुसक्या! अटकेचा घटनाक्रम वाचा
pooja khedkar ias news in marathi
IAS पूजा खेडकर यांचे कारनामे दिल्लीपर्यंत पोहोचले; थेट पंतप्रधान कार्यालयानं घातलं लक्ष, LBSNAA नंही मागवला अहवाल!
IAS Puja Khedkar
IAS Pooja Khedkar : पूजा खेडकरचा आणखी एक प्रताप समोर; दिव्यांग असल्याचे सांगून UPSC परीक्षेत मिळवली सूट
Pooja Khedkar First Reaction
Pooja Khedkar : वादानंतर IAS पूजा खेडकर पहिल्यांदाच आल्या माध्यमांसमोर; घडल्या प्रकाराबाबत विचारणा केली असता म्हणाल्या…
pooja khedkar ias mother manorama khedkar viral video
आता IAS पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा चर्चेत; गावकऱ्यांना पिस्तुल दाखवून धमकावतानाचा Video व्हायरल!
IAS Pooja Khedkar father Dilip Khedkar
Pooja Khedkar Father First Reaction : IAS पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “माझ्या मुलीने चूक…”

हैदराबादमधील सीमा शुल्क आणि सेवा कर अपीलीय न्यायाधिकरण (CESTAT) च्या मुख्य आयुक्त (अधिकृत प्रतिनिधी) यांच्या कार्यालयात एम. अनुसूया (३५) या कार्यरत आहेत. त्यांना त्यांचं नाव एम. अनुकथिर सूर्या असं बदलायचं होतं. तसंच, सरकार दफ्तरी असलेलं स्त्री लिंग बदलून पुरुष करायचं होतं. त्यांच्या विनंतीला सरकारने परवानगी दिली.

हेही वाचा >> लिंग परिवर्तन करण्यामध्ये पुरुषांची संख्या अधिक

“एम अनुसूया यांच्या विनंतीवर विचार करण्यात आला आहे. यापुढे सर्व अधिकृत नोंदींमध्ये अधिकारी एम अनुकथिर सूर्या म्हणून ओळखले जातील”, असं कागदपत्रात म्हटलं आहे. त्यांच्या LinkedIn प्रोफाइलनुसार, सूर्या यांनी डिसेंबर २०१३ मध्ये चेन्नईमध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून त्यांची कारकीर्द सुरू केली आणि २०१८ मध्ये त्यांना उपायुक्त पदावर पदोन्नती मिळाली. गेल्या वर्षी ते हैदराबादमध्ये त्यांच्या सध्याच्या पोस्टिंगवर रुजू झाले.

एम अनुकथिर सूर्या यांनी चेन्नईच्या मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये बॅचलर पदवी घेतली आहे. २०२३ मध्ये भोपाळमधील नॅशनल लॉ इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटीमधून सायबर लॉ आणि सायबर फॉरेन्सिक्समध्ये पीजी डिप्लोमाही त्यांनी पूर्ण केला आहे.

लिंग बदल करण्यात पुरुषांची सर्वाधिक संख्या

 बीडमधील महिला पोलीस ललिता साळवे हिने लिंग परिवर्तन केल्यानंतर लिंग परिवर्तन करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यात पुरुषांमध्ये लिंग परिवर्तन करण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. त्यानुसार मुंबईत शीव रुग्णालयात मागील काही महिन्यांत २१ पुरुषांनी लिंग परिवर्तन करून घेतले, तर सेंट जॉर्जेस रुग्णालयात लिंग परिवर्तनासाठी नोंदणी केलेल्यांमध्ये चारपैकी तिघे पुरुष आहेत.

कशी केली जाते लिंग बदल शस्त्रक्रिया

  • लिंग परिर्वतन करण्यात येणाऱ्या व्यक्तीचे मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन करण्यात येते.
  • त्यानंतर संबंधित व्यक्तीला महिला किंवा पुरुष बनायचे असल्यास त्याला काही दिवस त्यांचे कपडे घालण्यास सांगितले जाते.
  • ठराविक दिवसांनंतर त्या व्यक्तीला संप्रेरक उपचार पद्धतीसाठी एंडोक्रिनोलॉजिस्टकडे पाठविण्यात येते.
  • पुरुषांच्या छातीची शस्त्रक्रिया करून स्तन प्रत्यारोपण तर महिलांमधील स्तन काढण्याची प्रक्रिया केली जाते.
  • अंतिम शस्त्रक्रिया लिंग परिवर्तनाची असते. ही शस्त्रक्रिया सुघटनशल्य चिकित्सक आणि मूत्रपिंडविकार तज्ज्ञ एकत्रित किंवा स्वतंत्ररित्या करतात.