Shehzad Poonawalla: भाजपा निर्लज्ज पक्ष नाही, असे वक्तव्य शहजाद पूनावाला यांनी केले. सीजेपीच्या नीट पेपरफुटी आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिला पण, फेरपरीक्षेची जबाबदारी पार पाडली असे पूनावाला म्हणाले. झारखंड, पंजाब, कर्नाटकमध्ये सीजेपीने आंदोलनात हजेरी का नाही लावली? तिथं शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा का नाही झाला? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. नीट आंदोलन, सीजेपी, राहुल गांधी या मुद्यांवर पूनावाल यांनी भाष्य केले.
सीजेपीचे समर्थक प्रामाणिक आहेत पण, नेते नाहीत – पूनावाला
शहजाद पूनावाला यांनी बरखा दत्त यांच्या मोजो स्टोरीसाठी दिलेल्या पॉडकास्टमध्ये विविध विषयांवर मतं मांडली. “जंतर मंतरवरील आंदोलनात सर्वच तसे नव्हते काही जणांच्या भावना अत्यंत खरचं प्रामाणिक होत्या. विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याची चिंता वाटत होती, परीक्षांबद्दल प्रश्न उपस्थित केले जात होते या शंकाही प्रामाणिक होत्या. सीजेपीने या भावनांना हात घातला. यानंतर सोनम वांगचुक या आंदोलनाचा चेहरा झाले आणि सरकारने त्यांच्याशी चर्चा केली. पण, सीजेपीच्या अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी झारखंडमध्ये भेट दिली का? त्यांना टायफॉड झाल्याने ते जाऊ शकले नाहीत. झारखंडही जंतरमंतर एवढेच मोठे आंदोलन होते. सीजेपीचे समर्थक प्रामाणिक आहेत पण, नेते प्रामाणिक नाहीत”, असा आरोप शहजाद पूनावाला यांनी केला.
दीपकेंची जीवनशैली आलिशान असल्याचा आरोप
“सीजेपीचे नेते झारखंडमध्ये गेले नाहीत, माहतो यांना स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ताब्यात घेण्यात आले पण ते गेले नाहीत. जंतर मंतरवर सक्रिय असणारे झारखंडच्या बाबतीत शांत होते, यानंतर मी त्यांना अरविंद केजरीवाल यांचा छोटा रिचार्ज म्हटले आणि मी हे हजारवेळा म्हणेन”, असे पूनावाला म्हणाले. सीजेपी समर्थक प्रामाणिक असल्याचे पूनावाला म्हणाले तसेच, दीपकेंची जीवनशैली आलिशान असल्याचा आरोपही त्यांनी केला. सीजेपीच्या रांकांबरोबर राजस्थानमध्ये घडलेली घटना नागरिकांची भावनिक प्रतिक्रिया होती, असा दावाही पूनावाला यांनी केला. कर्नाटक, तेलंगणामध्ये किंवा हिमाचल प्रदेशमध्ये ए क्लास शासकीय शाळा आहेत का? पण हे केवळ भाजपा शासित राज्यात जात असल्याचा आरोप पूनावाला यांनी केला.
भाजपा निर्लज्ज पार्टी नाही – पूनावाला
“भाजपात तरी लाज, अब्रू आहे. भाजपा निर्लज्ज पार्टी नाही. भाजपात धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. प्रधान यांनी जबाबदारी स्वीकारली आणि त्यांनी फेरपरीक्षा करण्याची जबाबदारी घेतली. फेरपरीक्षा यशस्वी केली त्यांनी त्यांचा धर्म पाळला आणि नंतर राजीनामा दिला. धर्मेंद्र प्रधान यांनी रडत रडत का होईना जबाबदारी पार पाडली ना. पण, कर्नाटकमध्ये प्रियांक खर्गेंनी राजीनामा दिला का? काँग्रेच्या कार्यक्रमामुळे ३ विद्यार्थी उशीरा पोहोचले, प्रियांक खर्गेंनी राजीनामा दिला का? पंजाब, झारखंडमध्ये शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा झाला का?”, असा सवाल पूनावाला यांनी उपस्थित केला.
रिया अहिर आणि राहुल गांधींवर टीका
“आंदोलनावेळी चर्चेची जबाबदारी जे. पी. नड्डा यांच्यावर सोपविण्यात आली. नड्डांनी चर्चांनी केली पण पंजाबमध्ये झारखंडमध्ये कोणी चर्चा केली?”, असा सवाल पूनावाला यांनी उपस्थित केला. पूनावाला यांनी यावेळी मुंबईत पोलिसांची व्हॅन थांबवून ठेवणाऱ्या रिया अहिरवर देखील टीका केली. रियाने घटनेचा प्रसिद्धीसाठी वापर केल्याचा आरोप त्यांनी केला. “मी लहान २८ वर्षांची आहे, तुम्ही अंकल ३८ वर्षांचे आहात. मी जर अंकल आहे तर मग ५६ वर्षीय कोण आहेत? ते तर आजोबा झाले. ती त्यांना (राहुल गांधींना) जेन झींचा आयकॉन म्हणते आणि मी अंकल”, असे पूनावाला म्हणाले.
