Shehzad Poonawalla: भाजपाचे माजी राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी राहुल गांधी यांच्या कार्यशैलीवर टीका केली आहे. राहुल गांधी स्वार्थी असल्याचे म्हणत त्यांनी, “घारणेशाहीमुळे मिळालेल्या अडनावामुळे मीच नेता आहे असे त्यांना वाटते”, असा टोला लगावला. राहुल गांधींनी अपशब्द वापरत भाजपावर टीका केल्याचा आरोपही त्यांनी केला. पूनावाला यांनी ते राहुल गांधी किंवा विरोधी पक्षनेते असते तर काय केले असते? यावर बरखा दत्त यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.
राहुल गांधी जंतर मंतरवर का गेले नाहीत?
“राहुल गांधींमध्ये २००९ ते २०२६ या काळात सुधारणा झालीय का? तर याचं उत्तर हो असे आहे. त्यांच्या संवादामध्येही सुधारणा झाली आहे. पण, त्यांच्यात काही मर्यादाही आहेत. जशा अनेकांमध्ये असतात. राहुल गांधींचा सर्वात मोठा दोष असा आहे की मला सगळं कळतं असा त्यांचा समज आहे. नेता कोण? अशी शर्यत होती त्यामुळे राहुल गांधी जंतर मंतरवर गेले नाहीत. तसेच, राहुल गांधींना हे आंदोलन मोठा रिचार्ज अरविंद केजरीवाल यांनी बळ देत असल्याचे माहिती होते त्यामुळे ते तिथं गेले नाहीत”, असा दावा शहजाद पूनावाला यांनी केला. तसेच, “नरेंद्र मोदी २०२९ च नव्हे तर २०३४ पर्यंत सेट आहेत, त्यांना कोणी हटवू शकणार नाही”, असे पूनावाला पुढे म्हणाले.
राहुल गांधीवर टीका
“घारणेशाहीमुळे मिळालेल्या अडनावामुळे मीच नेता आहे असे त्यांना वाटते. छात्रों कि गूँजची घोषणा केली आणि गायब झाले हे सातत्य आहे का? अरविंद केजरीवाल यांच्यासह इतर नेते मोदींच्या समोर कोण नेता? असे म्हणत धावाधाव करत आहेत”, अशी टीका पूनावाला यांनी केली. राहुल गांधी स्वार्थी असल्याचा टोला लगावत पूनावाला यांनी ब्रिक्स परिषदेचाही दाखला दिला, ब्रिक्स परिषदेच्या व्हेज, नॉनव्हेज मेनूवर वाद घातल्याचेही त्यांनी नमूद केले. पूनावाला यांनी ते जर राहुल गांधी असते तर काय केलं असतं याचेही पुढे स्पष्टीकरण दिले.
मी राहुल गांधी असतो तर? पूनावाला म्हणाले…
“मी जर राहुल गांधी असतो, विरोधी पक्षनेता असतो तर मी पंतप्रधान नरेंद्र मोदींची आणि भाजपा नेत्यांची भेट घेतली असती. त्यांना सांगितले असते की मला या विषयावर राजकारण करता येईल पण यावर तोडगा काढूया. विद्यार्थ्यांसाठी एक व्यवस्था तयार करुया आणि एकत्र काम करुया. तसेच, समजा होर्मुझ सामुद्रधुनीचा विषय आहे. मी पंतप्रधानांकडे गेलो असतो त्यांना सांगितले असते की राजकारण करण्याची ही वेळ नाही. ऊर्जा सुरक्षेचा विषय आहे. कोणीही सत्तेत असो, विदेश धोरणात बदल होता कामा नये. शशी थरुर यांनी मी भेट घेतली असती आमचे मुद्दे मांडले असते. ऑपरेशन सिंदूरवर खासदारांना कशाला पाठवता? मी जातो असे म्हटले असते. जसं वाजपेयी गेले होते. राहुल गांधींनी असे केले असते तर त्यांची उंची वाढली असती”, असे शहजाद पूनावाला म्हणाले.
भाजपा निर्लज्ज पार्टी नाही – पूनावाला
“भाजपात तरी लाज, अब्रू आहे. भाजपा निर्लज्ज पार्टी नाही. भाजपात धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. प्रधान यांनी जबाबदारी स्वीकारली आणि त्यांनी फेरपरीक्षा करण्याची जबाबदारी घेतली. फेरपरीक्षा यशस्वी केली त्यांनी त्यांचा धर्म पाळला आणि नंतर राजीनामा दिला. धर्मेंद्र प्रधान यांनी रडत रडत का होईना जबाबदारी पार पाडली ना. पण, कर्नाटकमध्ये प्रियांक खर्गेंनी राजीनामा दिला का? काँग्रेच्या कार्यक्रमामुळे ३ विद्यार्थी उशीरा पोहोचले, प्रियांक खर्गेंनी राजीनामा दिला का? पंजाब, झारखंडमध्ये शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा झाला का?”, असा सवाल पूनावाला यांनी उपस्थित केला.
