नवी दिल्ली : मध्य अमेरिकेतील निकाराग्वा देशाच्या शेनिस पॅलासिओसने २०२३ चा ‘मिस युनिव्हर्स’ (विश्वसुंदरी) किताब जिंकला. आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत निकाराग्वाने मिळवलेले हे पहिले विजेतेपद आहे. ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेचे ७२ वे पर्व शनिवारी रात्री एल साल्वादोरची राजधानी सॅन साल्वादोर येथील जोस अडोल्फो पिनेडा एरिना येथे आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेत ‘मिस थायलंड’ अँटोनिया पोर्सिल्ड ही दुसरी आली आणि ‘मिस ऑस्ट्रेलिया’ मोराया विल्सनला तृतीय क्रमांक मिळाला. हिने पटकावल्याची माहिती ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेच्या अधिकृत ‘इंस्टाग्राम पेज’वर देण्यात आली. पॅलासिओसला अमेरिकेची गतविजेती आरबोनी गॅब्रिएलने विश्वसुंदरीपदाचा मुकुट प्रदान केला. पॅलासिओसने ८३ देशांतील सुंदरींमधून हा किताब जिंकण्याचा मान मिळवला. भारताच्या श्वेता शारदा हिची सर्वोत्तम २० स्पर्धकांच्या यादीत निवड झाली होती.



