कुंद्रा प्रकरण : “तिला रात्रीच सोडवावं लागेल, नाहीतर…”; त्या Chat वर Nuefliks च्या यश ठाकूरचा सिंगापूरमधून मोठा खुलासा

७ फेब्रुवारी रोजी अभिनेत्री गहनाला याच प्रकरणात अटक झाली तेव्हा यश ठाकूर आणि तन्वीरमध्ये झालेला संवाद पत्रकाराने वाचून दाखवला.

raj kundra arrest
एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला खुलासा (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस आणि पीटीआयवरुन साभार)

उद्योजक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना मागील सोमवारी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अश्लील चित्रपटांच्या निर्मितीसंदर्भात अटक केल्यापासून या प्रकरणामध्ये रोज नवे नवे खुलासे होत असतानाच आणखीन एक धक्कादायक दावा या प्रकरणाशीसंबंधित एका व्यक्तीने केलाय. न्यूफ्लिक्सचा मालक म्हणून इतक्या दिवस ज्याच्याबद्दल प्रसार माध्यमांमध्ये चर्चा रंगलेली त्या यश ठाकूरने एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना आपला राज कुंद्रा आणि उमेश कामतशी काहीही संबंध नसल्याचं यश ठाकूरने म्हटलंय. तसेच आपण न्यूफ्लिक्सचे मालक नसल्याचंही यशने म्हटलं आहे.

यश ठाकूरने झी न्यूजशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या खात्यावर आलेले पैसे हे न्यूफ्लिक्सचे असले तरी ते पैसे त्याला सल्लागार म्हणून देण्यात येत होते. “मी न्यूफ्लिक्सचा मालक नाहीय. एका आयटी कंपनीमध्ये मी सल्लागार म्हणून काम करतोय. माझ्या खात्यावर आलेले न्यूफ्लिक्सचे पैसे हे सल्लागार म्हणून देण्यात आलेले,” असं यश ठाकूर म्हणाला. पुढे बोलताना यश ठाकूरने आपला कुंद्रा आणि कामत यांच्याशी काहीही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. यश ठाकूरने त्याच्या मोबाइलवरुन तन्वीर हाश्मी नावाच्या व्यक्तीसोबत केलेल्या संवादाचा दाखला नंतर प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराने दिला.

नक्की वाचा >> “राज कुंद्राच्या हॉटशॉट्स App साठी काम केल्याने नवऱ्याने तिला घटस्फोट दिला”

७ फेब्रुवारी रोजी अभिनेत्री गहनाला याच प्रकरणात अटक झाली तेव्हा यश ठाकूर आणि तन्वीरमध्ये झालेला संवाद पत्रकाराने वाचून दाखवला. यामध्ये यशने, “मला रात्रीच तिला (गहनला) सोडवावं लागेल. यासाठी आठ लाखांची गरज आहे. तसेच तन्वीर नॉट रिचेबल असल्याचा उल्लेख केलेला. या प्रश्नाला उत्तर देताना यश ठाकूरने हा चॅटचा काहीच भाग असल्याचं म्हटलं आहे. तसेच पुढे पत्रकाराने याच संवादामधील आणखीन काही ओळींचा संदर्भ देत यश ठाकूर गहनाला सोडवण्यासाठी इतका का धडपड करत होता हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. “यामध्ये न्यूफ्लिक्सचं नाव आलेलं नाही. मात्र ती (गहना) न्यायालयामध्ये गेली तर सर्वांचं नाव सांगेन. हॉटशॉट्सचं, तुझं, न्यूफ्लिक्सचं त्यामुळे तिला रात्रीच सोडवावं लागेल नाहीतर प्रकरण कोणत्या वळणावर जाईल सांगता येणार नाही,” असं तुम्ही म्हणालेलात असं यशला विचारण्यात आलं. त्यावर उत्तर देताना यश ठाकूरने, “तन्वीरशी माझं बोलणं झालेलं. माझा राज कुंद्रा आणि उमेश कामतशी काहीही संबंध नाही,” असं सांगितलं.

सध्या यश ठाकूर हा सिंगापूरमध्ये असून राज कुंद्रा प्रकरणामध्ये यश ठाकूरच्या भूमिकेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेले. याच पार्श्वभूमीवर आता यश ठाकूरने हा खुलासा करत आपण राज कुंद्रा आणि उमेश कामत यांना ओळखत नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

नक्की पाहा >> कंडक्टरचा मुलगा, हिरे व्यापारी, शिल्पा शेट्टीशी लग्न ते पॉर्न प्रकरण; राज कुंद्रांबद्दलच्या ३० खास गोष्टी

पूनम पांडे, सागरिका शोना यासारख्या मॉडेल्सने मागील काही दिवसांपासून राज कुंद्रांच्या या अश्लील चित्रपट निर्मितीच्या उद्योगांसंदर्भात गंभीर आरोप केल्याचं दिसून आलं. याच प्रकरणासंदर्भात आता निकिता फ्लोरा सिंग या मॉडेलने ट्विटरवरुन राज कुंद्रांनी आपल्यालाही हॉटशॉट्ससाठी ऑफर दिली होती, असं म्हटलं आहे. सुदैवाने मी या ऑफरला नकार दिला. मात्र माझ्या ओळखीतील एका मुलीने या अ‍ॅपवरील व्हिडीओंमध्ये काम केल्याने तिच्या नवऱ्याने तिला घटस्फोट दिल्याचा धक्कादायक खुलासा निकिता फ्लोरा सिंगने केलाय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shilpa shetty husband raj kundra arrest yash thakur says i am not owner of nuefliks scsg